आरोग्यमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

महाराष्ट्र दिनी भव्य दिव्य ‘अहमदनगर फॅशन रनवे 2022’ संपन्न

गरोदर मातांच्या रॅम्प वाकने नगरकरांची मने जिंकली

नगर: करोना महामारीचे सावट आता दूर झाले असता पुन्हा एकदा सर्वजण नव्या जोशात भरारी घेण्यास सज्ज झाले आहेत. याच सकारात्मक वातावरणात रविवार दिनांक 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या रोजी नगर येथील नंदनवन लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा अहमदनगर फॅशन रनवे 2022 या कार्यक्रमादरम्यान पहायला मिळाले. या फॅशन रनवेमध्ये विषेशतः गरोदर मातांनी केलेल्या रॅमवॉक ने उपस्थित नगरकरांची मने जिंकली. गरोदरपणात माता जितकी आनंदी व सकारात्मक असेल तितके बाळंतपण चांगले होते हे आता शास्त्रीय अभ्यासातही सिध्द झाले आहे. त्यामुळेच सरस्वती हॉस्पिटलने नगरमध्ये दुसर्‍यांदा गरोदर मातांना रॅम्प वाकचे माध्यम उपलब्ध करून दिले होते.

या शो मध्ये नवविवाहित जोडप्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे, त्यांच्यातील नात्याचे बंध अधिक घट्ट व्हावेत यासाठी त्यांचीही वेगळी कॅटेगरी यात होती. संसारात मग्न झालेल्या जोडप्यांनाही नव्याने एकमेकांना समजून घेण्याची, रोजच्या चक्रातून बाहेर पडत एकमेकांसमवेत निखळ आनंद मिळवण्याची संधीही या शोमध्ये पाहायला मिळाली. याशिवाय आई व मुलीचे अतिशय प्रेमळ नात्याची गुंफणही रॅम्पवरुन सर्वांना कळावी यासाठी आई आणि मी ही कॅटेगरीही ठेवण्यात आलेली होती. विवाहित महिलांनाही परिघाबाहेर पडून खास स्वत:चा असा आनंद मिळावा यासाठी त्यांच्यासाठीही स्वतंत्र कॅटेगरी या शोमध्ये प्रेक्षकांना मोहीत करणारी ठरली. महानगरांमधील ग्लॅमरस असा फॅशन शो थेट नगरमध्ये होत असल्याने प्रत्येक सहभागीला एक मोठं व निखळ आनंद देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देता आले याच समाधान आयोजक सरस्वती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल जाधव यांनी व्यक्त केले.

आताच्या काळात दूरचित्रवाणी, इंटरनेटमुळे जगभरातील फॅशन शो, तेथील मॉडेल्सचे सादरीकरण सर्व जण पाहत असतात. नगर शहरातही असा आधुनिक काळातील फॅशन शो घ्यावा, स्थानिक टॅलेंटला व्यासपीठ मिळावे हा उदात्त उद्देश समोर ठेवून फॅशन कार्निव्हलने न्यू टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे या भव्य दिव्य अहमदनगर फॅशन रनवेचे आयोजन केले होते. यात मिस, मिसेस, नवविवाहित कपल, गरोदर माता, मी आणि आई अशा कॅटेगरीज ठेवण्यात आल्या होत्या. नगर शहर वेगाने बदलत आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करताना आजच्या काळातील फॅशन इंडस्ट्रीत करियर करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी नगरमध्येच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा अभिनव प्रयत्न या कार्यक्रमातून होत आहे.यातून अनेकांची मॉडेलिंग क्षेत्रातील करियरची पायाभरणी होवू शकते.

सरस्वती हॉस्पिटलने हा शो आयोजित केला तर टायटल स्पॉन्सर महावीर ग्रुप होते. शोसाठी स्पॉन्सर आणि पार्टनर आय लव्ह नगर, हॉटेल नंदनवन, फॅशन कार्निव्हल, रेडिओ सिटी, अहमदनगर स्टोरीज, न्यूक्लियस हॉस्पिटल, ओस्तवाल किचन्स, श्रीमान, नारी फॅशन्स, स्मित डेंटल क्लिनिक, कास्ट इंडिया, रेनड्रॉप फोटोग्राफी, हॉटेल पॅराडाईज, चंगेडिया आऊटडोअर्स, गुड गिफ्ट 24, आयएएफडी, साईटेक, प्रगती डेव्हलपर्स, वेदांग, रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब आदिमचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!