पुणेविशेषसामाजिक

कै. ज्योतीताई कोटकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन

पिंपरी चिंचवड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई कोटकर यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील : विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि गेली अनेक वर्षे स्त्री आधार केंद्रासोबत धडाडीने काम करीत असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कै. ज्योतीताई कोटकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ नीलम गोऱ्हे आणि प्रमुख विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी यांनी आज त्यांच्या कुटुंबीयांची राहत्या घरी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व कुटुंबीयांचे सांत्वन केले. ज्योतीताईसारख्या निरलस आणि सच्च्या कार्यकर्त्यांच्या मुळेच सामाजिक काम उभे राहत असते. त्यांचे कार्य आणि स्वभावातील गोडवा कायमच स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

शिवसेना पदाधिकारी धनंजय आल्हाट आणि राजेश वाबळे हे देखील कुटुंबीयांसोबत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!