क्रीडापुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

फॅमिली इंटिरियर आणि संभाला होम तर्फे रंगणार “बॉलिंग टूर्नामेंट २०२४

नवीन खेळांचा आनंद घेण्यासाठी बॉलिंग टूर्नामेंटचे आयोजन -मितेश पतंगे

पुणे (प्रतिनिधी): प्रचलित आणि पारंपरिक खेळा सोबतच आता नवीन खेळांचा अनुभव आणि आनंद घेता यावा यासाठी फॅमिली इंटिरियर मॅगझिन ने बॉलिंग टूर्नामेंटचे (bowling tournament) आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये एकूण ७५ आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर सहभागी होणार असून त्यात ३५ महीला खेळाडूंचा समावेश आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी शंभाला होम्स यांचे टायटल स्पॉन्सर म्हणून सहकार्य लाभले आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक व फॅमिली इंटिरियर मॅगझिनचे संचालक मितेश पतंगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संभाला होमचे संचालक आदित्य जिंदाल व विष्णू नायर देखील उपस्थित होते.

मितेश पतंगे म्हणाले, कामाच्या व्यापातून थोडीशी फुरसत घेऊन आपल्याच क्षेत्रातील मित्र मैत्रिणींसोबत आनंदी वेळ घालता यावा या प्रमुख उद्देशाने सदर बॉलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फॅमिली इंटरियर गेल्या सात वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील एकमेकांमधील संवाद आणि नेटवर्किंग वाढेल.

स्पर्धे विषय बोलताना ते म्हणाले, स्पर्धेत एकुण सात संघ मालक असून प्रत्येक मालकाकडे दोन संघ असतील. एका टीममध्ये पाच सराव वास्तुविशारद आणि इंटीरियर डिझायनर असणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्व वास्तुविशारद, इंटिरियर डिझायनर्ससाठी सहा दिवस सराव सत्राची योजना आखली असून स्पर्धेचा अंतिम सामना १४ आणि १५ डिसेंबर रोजी गेम पॅलाझो मिल्स येथे खेळला जाणार आहे; असे देखील त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!