
पुणे: जॉन्सन कंट्रोल्स कॉलेज पार्टनरशिप प्रोग्राम अंतर्गत, पुण्यातील डॉन बॉस्को आणि श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयांना प्रत्येकी 20,000 डॉलरची देणगी देण्यात आली. हा देणगी कार्यक्रम हॉटेल नोवोटेल, विमान नगर, पुणे येथे पार पडला.
जॉन्सन कंट्रोल्सने ही दोन महाविद्यालये निवडली कारण ती वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी देत आहेत. हा निधी शिक्षण शुल्क, पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्य विकास आणि प्रमाणपत्रांसाठी वापरला जाईल.याव्यतिरिक्त, जॉन्सन कंट्रोल्स संभाव्य प्लेसमेंटसह इंटर्नशिप संधी विद्यार्थ्यांना प्रदान करणार आहे.
यावेळी जॉन्सन कंट्रोल्सच्या फायनान्स शेअर्ड सर्व्हिस सेंटर्सचे उपाध्यक्ष मितुल रुस्तगी म्हणाले कि, “प्रत्येक तरुणाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मदत व संधी दिली पाहिजे. जॉन्सन कंट्रोल्स समुदाय तयार करून त्याचा विकास करण्यासाठीच येथे आहे. आम्ही कॉलेजबरोबर पार्टनरशिप कार्यक्रमाबद्दल उत्साहित आहोत आणि आमचा पाठिंबा वाढवण्यास उत्सुक आहोत,”.