पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सदस्य नोंदणीने शिवसेना सभासद नोंदणीचा श्रीगणेशा

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरूवात करण्यात आली. शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या, विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा अर्ज भरून या सदस्य नोंदणी अभियानाची सुरूवात करण्यात आली.
डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सिल्व्हर रॉक्स या पुण्यातील निवासस्थानी त्यांचा शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज भरण्यात आला. तो शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे यांच्याकडे दिला.
यावेळी पुणे शहर संघटक राजेंद्र शिंदे, अविनाश मरळ, रवी म्हस्के आदी शिवसैनिक उपस्थित होते.