हिंदू आध्यात्मिक एवम सेवा संस्थान तर्फे’ आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाला सुरूवात

पुणे (प्रतिनिधी): हिंदू आध्यात्मिक एवम सेवा संस्थान, Hindu Spiritual and Service Foundation च्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यामध्ये आज ९ आगस्ट क्रांती दिवस ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना प्रयत्न विविध उपक्रमाचा श्रीगणेशा श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन करून तेथील चौकात ७५ स्वातंत्र्य सेनानींचा परिचय व इतिहास सांगणारे ७५ फूटी बॅनर लाऊन अभिवादन करण्यात आले. या शुभारंभाच्या वेळी जेष्ठ गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल, टकाटक चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब व इतर कलाकार, हिंदू आध्यात्मिक एवम सेवा संस्थानचे अध्यक्ष अशोक भाई गुंदेचा, उपाध्यक्ष महेशराव सुर्यवंशी, सुनील रासने, महामंत्री किशोर येनपूरे, चरणजीतसिंग सहाणी,राधेश्याम अग्रवाल, संजय भोसले, अखिल झांजले, बक्षीसिंग, सिद्धेश कांबळे, अनिल परब, सुंनदा राठी, प्रल्हाद राठी आदि प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत स्वातंत्र्य लढ्यातील ७५ अनसन हिरोज चे ७५ फुटी बॅनर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर चौक, दादावाडी जैन मंदिर, गुरूद्वारा कॅम्प, इस्कॉन मंदिर, स्वामी नारायण मंदिर अशा विविध एकविस (२१) ठीकाणी लावण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक भाई यांनी दिली.
आज ९ ऑगस्ट पासून ते १ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व शाळेतील विद्यार्थी, रहिवासी सोसायटी, गृहनिर्माण संस्थान मध्ये राष्ट्रभक्ती जागरण अभियानांतर्गत निबंध, वक्तृत्व, चित्रकला, अभिनय नाटक, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीसांचे वितरण हिंदू आध्यात्मिक एवम सेवा संस्थानाच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती संस्थेचे महामंत्री किशोर येनपूरे यांनी यावेळी दिली.