महाराष्ट्रविशेषशैक्षणिक

महात्मा फुले इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थांनी झाडांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन

बुलढाणा: भावा-बहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. झाडे आपल्याला संरक्षण, ऑक्सिजन देतात. आपले नैसर्गिक पोषण करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि हे अनोखे नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी बुलढाणा शहरातील महात्मा फुले इंग्लिश स्कूल मध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

वृक्ष-रक्षाबंधनातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे नाते जपत झाडांना राखी बांधली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रध्वजाचे चित्र रेखाटून मानवंदना दिली. सदर उपक्रमात विद्यार्थी, महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या भावांना (झाडांना) राखी बांधली.

यावेळी शाळेचे प्राचार्य अविनाश सुरडकर, हिरा क्षिरसागर, भावना वावगे, अर्चना सातव, संगिता तरमळे, कविता भुसारी, कमल वैद्य, श्रीकृष्ण पवार शिक्षक व इतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!