पुणेमनोरंजनराजकीय

स्त्रीला दुर्गा होण्यास भाग पाडू नकात: अभिनेत्री शर्वरी जेमनिस

नीलेश गिरमे यांच्या वतीने महा भोंडल्याचे आयोजन

पुणे: स्त्रीचं महत्त्व हे केवळ नवरात्री पुरतं न ठेवता, तिला वर्षभर सन्मान द्या. स्त्री ही प्रत्येक रुपात मनोहारी असते. ती जोपर्यंत लक्ष्मी, सरस्वती या सौम्य रुपात आहे, तोपर्यंत ती सर्वांना सुखी ठेवते. मात्र, तिच्यावर अन्याय करून कोणत्याही स्त्रीला दुर्गा होण्यास भाग पाडू नका, असे आवाहन अभिनेत्री शर्वरी जेमनिस यांनी केले.

शिवसेना खडकवासला व संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेशोत्सव काळात गौरी – गणपती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांचा बक्षीस वितरण समारंभ धायरी येथील सुवासिनी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा रुपाली चाकणकर, राधिका गिरमे, नीलेश गिरमे, अभिनेत्री स्वाती हनमघर, सलोनी सातपुते, श्रेया पासलकर, बालकलाकर सानिका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, मातृत्व निभावताना स्त्री ही जास्त सक्षम झाली आहे. हीच सक्षम स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये देखील पाहिले सुवर्ण पदक मीराबाई चाणूने खेचून आणताना आपली क्षमता सिद्ध केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर, आभार नीलेश गिरमे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!