डॉ. नीलम गोर्हे यांच्या वाढदिवसाला हजारोंची उपस्थिती
पुण्यात सिल्व्हर रॉक्स येथे अनेक शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून , एस एम् एस आणि मेसेजद्वारे केला शुभेच्छांचा वर्षाव
पुणे: विधान परिषदेच्या उप सभापती, शिवसेना उपनेत्या आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा ना. डॉ. नीलम गोर्हे यांच्या वाढ दिवसानिमित्त आज पुण्यात त्यांच्या सिल्व्हर रॉक्स या निवास स्थानी भेटून अनेक प्रतिष्ठित नागरिक, सनदी अधिकारी, पोलिस अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
यामध्ये भारताच्या माजी राष्ट्रपति श्रीमती प्रतिभाताई पाटील, रश्मी ठाकरे, खासदार श्रीनिवास पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते रविंद्र मिर्लेकर, आ. सचिन अहिर, आ. सुभाष साबणे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, कोंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिकारी बचन सिंह, मिलिंद भारंबे, अरविन्द माने, शासकीय अधिकारी प्रशांत नारनवरे, पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे, नागपूर येथील पत्रकार अविनाश पाठक, महेश उपदेव, कोल्हापूर तरुण भारतचे पत्रकार रियाज ट्रेनर संस्कृतिक क्षेत्रातील उत्तरा मोने, आदींनी दूरध्वनी करून डॉ. गोर्हे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
सिल्व्हर रॉक्स येथे प्रत्यक्ष भेटणार्यांमध्ये शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, संजय वाल्हेकर, अमोल हरपळे, राजेंद्र शिंदे, शिरीष फडतरे, आनंद गोयल, प्रशांत राणे विठ्ठल गायकवाड, अविनाश मरळ, सुशांत खिरिड, गणेश सांडभोर, स्नेहल पटले, सुनीता विलास गोसावी, करुणा घाडगे, अविनाश मरळ, बाळासाहेब भांडे, मयूर भांडे, मुळशी तालुक्यातील पदाधिकारी राम गायकवाड, महिला आघाडीच्या अनीता परदेशी, अश्विनी शिंदे, स्वाति कथलकर, पौर्णिमा बहिरट, विजया शिंदे, सुरेखा दुबे, अर्चना सांडभोर, स्वाती ढमाले, नीलम चव्हाण, लक्ष्मण तेलंग, वेल्हा तालुक्यातील पदाधिकारी शैलेश वालगुडे, सतीश शेलार, सुनील शेंदकर, अक्षय वालगुडे, उमेश नलावडे, सागर सातकर, तेजस बेनकर सांगली शिवसेनेचे पदाधिकारी बजरंग पाटील, सुनीता मोरे, सोलापूर येथून अस्मिता गायकवाड, पिंपरी चिंचवड परिसरातील राहुल कलाटे, वैशाली मराठे, आकाश जगताप, योगेश गोसावी, उमेश वाघ, धुळे येथून प्रियंका जोशी, ठाणे येथून विशाल आणि विकास ननावरे, आदि मान्यवर सकाळच्या सत्रात उपस्थित होते.