कल्पक शेतीय पद्धती, महिला शेती-उद्योजिका आणि नैसर्गिक शेतीय उपक्रमांकरिता माहाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मिळविला आऊटग्रो किसान प्रगती पुरस्कार
पुणे: दक्षिण भारतातील एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांसह काम करत असतांना, आर्टिफ़िशीयल इंटेलिजन्सवर आधारलेली,शेतीय व्यवस्थापन आणि काळानुरूप मार्गदर्शन करणाऱ्या, वेकुल फ़ूड्सच्या आऊटग्रोद्वारे आऊटग्रो किसान प्रगती पुरस्कार 2022 ची घोषणा करण्यात आली. शेतीय आणि बागायतीशेतीमधील सर्वोत्तम अशा पद्धती ओळखण्याचे ध्येय साध्य करत यंदामहाराष्ट्र राज्यातील नऊ शेतकऱ्यांना तीन श्रेणींमधून गौरविण्यात आले, ज्या होत्या शेतीय कल्पकता, नैसर्गिक शेतीय उपक्रम आणि महिला शेती-उद्योजिका.
यावेळी बोलताना आऊटग्रो आणि शेतीय प्रतिबद्धता प्रमुख श्री. सेन्धिल कुमार म्हणाले, “ गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमानी बरेच कल्पक बदल घडून आलेले असून त्याचा एकूणच पर्यावरण प्रणालीला फ़ायदा झालेला आहे. याबदलास स्वीकारण्यामध्ये वेकुल नेहमीच अग्रस्थानी राहिलेली असून आऊटग्रो आमचे असे एक व्यासपिठ आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांसह थेट काम केले जाते, खांद्याला खांदा लावून लाभदायी आणि टिकाऊ अशा भविष्याकडे वाटचाल करण्याचा एक प्रयत्न केला जातो. आम्ही मोठ्या प्रमाणावर जरी शेतकऱ्यांसह काम करत असलो तरी काही तळागाळातील आणि लपून राहिलेल्या कल्पकता आहेत ज्यांना प्रकाश झोतात आणून योग्य ती ओळख मिळवून देणे फ़ार आवश्यक आहे. किसान प्रगती पुरस्कार याच हेतूने दिले जातात, यामुळे उत्तम अशा पद्धती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आणल्या तर जातातच पण एक शैक्षणिक व्यासपिठाची निर्मीती देखील केली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना अशा कल्पकता आजमावता येतील आणि नैसर्गिक आणि पुनरुत्पादक शेतीचा अवलंब करता येईल. सगळ्या विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या कल्पकता पुढे नेत भारतातील अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम आम्ही करत राहू.”
नामांकन प्रक्रियेमध्ये सुमारे 500 अर्ज आले होते ज्यांच्यातून तज्ञ मंडळाद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली.या तज्ञ मंडळामध्ये प्रा.डॉ. महावीर चव्हाण , विद्यार्थी कल्याण अधिकारी महात्मा फ़ुले शेतीय विद्यापिठ राहुरी आणि संचलाक राष्ट्रय सेवा योजना (एनएसएस) यांचा समावेश होता, तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभा, पुणे जिल्ह्याचे आमदार श्री. महेश लांडगे, इन्स्टिट्युट ऑफ़ इंडियन काऊन्सिल ऑफ़ ॲग्रीकल्चर रिसर्चमधील एका महत्वाच्या असलेल्या द्राक्षाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.जी सोमकुवर, रेसिड्यु फ़्री ॲन्ड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फ़ेडरेशनचे(ROMIF INDIA)राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. प्रशांत नायकवाडी, आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. प्रशांत शेटे उपस्थित होते.
किसान प्रगती पुरस्कार 2022 चे महाराष्ट्रातील विजेते आहेत:
शेतीय कल्पकता: श्री. विजय गारगोटे, श्री. मयुर वाघ, श्री.भूषण निकम
नैसर्गिक शेतीय उपक्रम: श्री. नागेश नानवरे, श्री. विश्वनाथ होलगे, श्री. शरद बोंडे
महिला शेती-उद्योजिका: श्रीमती. सुरेखा नंदकुमार जाधव, श्रीमती. द्रौपदी संतोष कांगुलकर, श्रीमती राणी बाळासाहेब नाईक
आऊटग्रो बद्दल थोडक्यात:आऊटग्रो हा शेती आणि शेतकऱ्यांना जोडणारा वेकुलचा एक भाग आहे, ज्याची स्थापना 4 मार्च 2020 साली करण्यात आली. आपल्या आर्टिफ़िशीयल इंटेलिजन्स व्यासपिठाच्यामदतीने- आऊटग्रो द्वारे 2 लाखापेक्षा अधिक डाऊनलोड्स मिळविले आहेत. शेतीय-डॉक्टरांच्या समूहाच्या मदतीने आऊटग्रोद्वारे व्यापक असा सल्ला आणि विविध उपाययोजना 150000+ अधिक शेतकऱ्यांना दिला जातो. आऊटग्रो ॲपच्यामाध्यमाने पिका आरोग्याबद्दलची माहिती, मातीची तपासणी, वातावरणीय परिस्थिती, चालू काळामधील वातावरणीय परिस्थिती, बाजार भाव आणि इतर शेतीय सल्ले तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील शेतकऱ्यांना दिले जातात.