ॲलन करिअर इन्स्टिट्यूट पुणे च्या विद्यार्थ्यांचे जेईई ऍडव्हान्स परीक्षेत लक्षणीय यश
2 विद्यार्थ्यांनी टॉप १०० मध्ये, तर टॉप ५०० मध्ये 6 विद्यार्थ्यांनी प्राप्त केले स्थान

पुणे : आपल्या सर्वोत्तम शिक्षणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ॲलन करिअर इन्स्टिट्यूट पुणे च्या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेमध्ये लक्षणीय संपादन केले आहे. नुकत्याच घोषित झालेल्या जेईई च्या निकालामध्ये पुणे सेंटरच्या दोन विद्यार्थ्यांनी देशभरातून टॉप हंड्रेड मध्ये तर सहा विद्यार्थ्यांनी टॉप फाइव हंड्रेड मध्ये स्थान प्राप्त केले आहे.
जेईई परीक्षेमध्ये सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲलन पुणे च्या कॅम्पस मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी ॲलन इन्स्टिट्यूट पुणे चे सेंटर हेड अरुण जैन यांच्यासह प्राध्यापक व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
ॲलन पुणे सेंटरचा विद्यार्थी आर्यन महाजन याने ऑल इंडिया रँकिंग मध्ये 79 वे तर ऋषभ कोटेचा याने 89 वे ऑल इंडिया रँकिंग प्राप्त करून आपले व आपल्या मातापित्यांचे तसेच पुणे सेंटरचे नाव रोशन केले आहे.या दोघांशिवाय सार्थक तोष्णीवाल, यश साबळे, ऋषिराज राळेभट्ट, आदित्य गुप्ता, ध्रुव शहा या विद्यार्थ्यांनीही जोरदार यश संपादन करीत देशभरातून टाॅप फाईव्ह हंड्रेड विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त केले आहे.. या सर्व विद्यार्थ्यांचा सेंटर हेड अरुण जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या प्रचंड यशाबद्दल ॲलन पुणेच्या सेंटरवर ढोल ताशे वाजवून तसेच नाच गाण्यातून जोरदार जल्लोष करण्यात आला. यापुढील काळातदेखील अॅलन पुणे सेंटरचे हे यश असेच कायम राहील, असा विश्वास सेंटर हेड अरुण जैन यांनी व्यक्त केला.