आरोग्यक्रीडापुणेमहाराष्ट्र

अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांसमोर योगाची प्रात्यक्षिकेश्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टचा उपक्रम

पुणे : सुमारे 350 वर्षांपूर्वी उभारलेल्या तसेच ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेल्या सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिर आवारात शताब्दी वर्षात पदार्पण केलेल्या श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टतर्फे आज जागतिक योग दिनानिमित्त आबासाहेब अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय स्तरावरील योगपटू विठ्ठल कडू व त्यांची मुले सिद्धेश (वय 12) व नारायणी कडू (वय 8) यांनी क्लिष्ट योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून मुलांसह उपस्थितांना अचंबित केले. सिद्धेश व नारायणी हे दोघेही राष्ट्रीय योगपटू आहेत. अत्रे प्रशालेतील सुमारे 40 विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके पाहिली. सिद्धेश याने चक्रासन, बिंभासन, कोकिळ भुजंगासन, पार्श्वपद्मासन, राजकुक्कुटासन, मंडूकासन अशी विविध क्लिष्ट आसने लिलया सादर केली.

गौरव सोनवणे, ऋषिकेश सोनवणे, सचिन लांडगे, प्रकाश लांडगे, सचिन पवार, सोहम हंबीर, हर्षद बर्लाल हे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागतपर प्रास्ताविकात पियुष शहा यांनी योगासनांची महती विशद करून उपक्रमाची माहिती दिली. शरीर, मन आणि आत्मा याचा उत्तम समतोल साधण्यासाठी योग किती उपयुक्त आहे याविषयी त्यांनी विवेचन केले.

मंडळाचे कार्यकर्ते सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. ट्रस्टच्या शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेवू असेही त्यांनी सांगितले. योगपटूंचा सत्कार विश्वासराव सोनवणे यांनी केला.अत्रे प्रशालेतील ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी आभार मानले.

ट्रस्टतर्फे शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग नक्की असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टच्या शताब्दी वर्षानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. फोटो : योग प्रात्यक्षिके सादर करताना सिद्धेश कडू व नारायणी कडू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!