पुणेमहाराष्ट्रव्यवसायीक

सफायर सेल्स कॉर्पोरेशन’च्या भव्य दालनाचे उद्घाटन

सॅनिटरी वेअर व बाथरूम फिटिंग उत्पादनांच्या वितरणाची गोयल ब्रदर्सची ३५ वर्षांची परंपरा

पुणे : गेल्या ३५ वर्षांपासून सफायर सेल्स कॉर्पोरेशन प्रा. लि. बाथरूम फिटिंग, तसेच सॅनिटरी व प्लम्बिंग उत्पादनाच्या वितरणाची विश्वासार्ह सेवा पुरवत आहे. आता ‘सफायर’तर्फे कोंढवा येथे बाथरूम फिटिंगसह मॉड्युलर किचन, फर्निशींग्ज आणि डेकोरेटिव्ह लायटिंग चारही प्रकारच्या उत्पादनाचे वितरण करण्यासाठी सुशोभित भव्य दालन गंगाधाम-इस्कॉन मंदिर रस्ता, कोंढवा येथे ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले असून, त्याचे उद्घाटन मंगळवारी झाले.

‘सफायर’चे ज्येष्ठ संस्थापक व व्यवस्थापन सदस्य श्यामसुंदर गोयल यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी गोयल ब्रदर्सपैकी किसन गोयल, राजेंद्र गोयल व संजय गोयल यांच्यासह नव्या पिढीतील अमित गोयल, अक्षय गोयल, आदित्य गोयल, अनुज गोयल, अंकित गोयल आदी उपस्थित होते. इंटेरियर डिझायनर मिलिंद चिंगळे, प्राची जैन, हुरी मेघानी, अखिल गुजराथी, आर्किटेक्ट विपीन बोरा, रश्मी बंब यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

पुण्याच्या दक्षिण-पूर्व भागात स्थित, घराच्या उत्तम व सुंदर अंतर्गत सजावटीसाठी आवश्यक अशा वरील चारही उत्पादनांचा पुरवठा करणारे हे एकमेव असे दालन असणार आहे. या तीन मजली दालनात बाथरूम फिटिंग, मॉड्युलर किचन, फर्निशिंग्ज व डेकोरेटिव्ह लाइटिंगची डिझायनर व नाविन्यपूर्ण अशी उत्पादने ग्राहकांना मिळणार आहेत.

डिझायनर सॅनिटरी वेअर, टाईल्स, वॉटर सोल्युशन, मॉड्युलर किचन, होम अप्लायन्सेस, सिंक व फॉसेट्स, आकर्षक पडदे, ब्लाइंड्स, गाद्या, कार्पेट्स, वॉलपेपर आणि डेकोरेटिव्ह व आर्किटेक्चरल लाईट्स, डिझायनर फॅन्स अशा असंख्य वैविध्यपूर्ण भारतीय व विदेशी उत्पादनांची मालिका येथे उपलब्ध असणार आहे.याबाबत सविस्तर माहिती देताना अमित गोयल म्हणाले, “शामसुंदर, किसन, राजेंद्र आणि संजय गोयल या चौघा भावांनी १९८८ मध्ये बाथरूम फिटिंगचा व्यवसाय पुण्याच्या मध्यवर्ती म्हणजे स्वारगेट भागात ३५० स्केअर फूट जागेत सुरु केला.

ग्राहकाभिमुख आणि विश्वासार्ह सेवेमुळे गेल्या ३५ वर्षात यशाची अनेक शिखरे गाठत गोयल बंधूनी हा उद्योग विस्तारला आहे. ग्राहक हा केंद्रबिंदु आणि त्यांचे समाधान हा उदात्त हेतू ठेवून बांधकाम क्षेत्राला लागणारे उत्तम प्रतीचे उत्पादन वितरित केले. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात बाथरूम फिटिंगच्या उत्पादनांसाठी ‘सफायर’चे नाव अग्रस्थानी आहे.”

“बाथरूम फिटिंगच्या उत्पादनांसह तीन वर्षांपासून किचन सेवा, दोन वर्षांपासून फर्निशिंग्ज, तर यंदापासून लाइटिंग उत्पादने वितरित करण्याची सेवा सुरु करत आहोत. चार विभागांतील सर्व उत्पादने ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जवळपास १० हजार स्क्वेअर फुटांचे दालन असणार आहे. उत्पादनासोबत आता आम्ही कस्टमायझेशन सेवाही पुरविणार आहोत. पुढील काळात ग्राहकांना ही विश्वासार्ह सेवा देण्यावर आमचा भर असणार आहे,” असे गोयल यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!