लर्न ऑनलाइनचे पुण्यात पहिले अनुभव केंद्र सुरू

पुणे: लर्न डॉट ऑनलाइन (Learn.Online) या ऑनलाइन शिक्षण क्षेत्रातील कंपनीने आज येथे पहिले अनुभव केंद्र सुरू केले. कर्वे रोड येथे हे अनुभव केंद्र असून, याचे औपचारिक उद्घाटन जेएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. बी.बी. आहुजा, वॉलनट स्कूल्सचे सह-संस्थापक श्री. निखिल करकरे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापन, प्रशासकीय नेतृत्व आणि संशोधन क्षेत्रात 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय बी झोपे होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात योग्य अभ्यासक्रम आणि संस्था निवडण्याला खूप महत्त्व आहे. हे आव्हान पेलण्यासाठी २०२२ मध्ये लर्न ऑनलाइनची स्थापना करण्यात आली.
विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित संस्था, त्यांचे विविध अभ्यासक्रम आणि त्यांच्या ऑफर याचे सर्वसमावेशक विश्लेषण करून, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. संस्थेचे अनुभवी समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करतात.स्थापनेपासून, कंपनीने उच्च मानांकन असलेली विद्यापीठे,३० पेक्षा अधिक उद्योग-संबंधित अभ्यासक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, बिझनेस अॅनालिटिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एचआर, फायनान्स, विपणन आदी क्षेत्रांतील १०० पेक्षा अधिक विशेष अभ्यासक्रम असणाऱ्या संस्थांशी भागीदारी केली आहे.
पुण्यात लर्न डॉट ऑनलाइन संस्थेने (Learn.Online) आपले पहिले केंद्र उघडले असून, विद्यार्थ्यांना आदर्श पदवी अभ्यासक्रम निवडण्यात मदत करण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. येथे तज्ञ समुपदेशकांद्वारे करिअर मेंटॉरशिप सत्र घेतले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदत करते. हे केंद्र दीर्घकालीन करिअरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य शैक्षणिक निर्णयांसाठी योग्य दृष्टिकोन विकसित करण्यासह योग्य निवडीसाठी मार्गदर्शन करते. यासाठी परस्परसंवादी डेमो ऑनलाइन वर्गांची सुविधा आहे.
सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी सेवा देणारे हे केंद्र विद्यार्थ्यांना उच्च कौशल्य आणि प्रगती पथावर यशस्वी वाटचाल करण्यास सक्षम करते. यावेळी युएसडीसी प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लि.चे सह-संस्थापक डॉ. टॉम एम जोसेफ म्हणाले, “पुण्यात आमचे पहिले अनुभव केंद्र सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या सहाय्याने विद्यार्थ्याना माहितीपूर्ण शैक्षणिक निर्णय घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी डिझाइन केले आहे. ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात सध्या निवडीची मोठी संधी आहे.
या क्षेत्रात लर्न डॉट ऑनलाइन (Learn.Online) हे मार्गदर्शक होकायंत्र म्हणून काम करते. ही संस्था विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्दिष्टांशी जुळणारे पदवी अभ्यासक्रम निवडण्यात मदत करते. ऑनलाइन शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प स्वीकार करून प्रवेशयोग्य आणि उच्च-गुणवत्तेच्या शिक्षणाच्या संधींद्वारे जीवन बदलण्याचे आमचे ध्येय आहे. “”नजीकच्या भविष्यात संपूर्ण भारतात अशी आणखी अनुभव केंद्रे सुरू करण्याचा आमचा विचार आहे. आम्हाला “शैक्षणिक यशासाठी तुमचा नवीन पत्ता” व्हायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील कर्वे रोडवर अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेले हे केंद्र उच्च शिक्षणाचा ध्यास असलेल्या आणि उत्कृष्टतेची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करते.