पुणे शहर पोलिसांची २६/११ हल्ल्यातील शहिदांना मानवंदना व पुणेकरांची चित्र श्रद्धांजली
पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने आयोजन
पुणे : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुण्यात सारसबागेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून स्तंभ उभारण्यात आला होता. यावेळी बँडचे वादन करीत मानवंदना देण्यात आली.
उपस्थित नागरिकांनी देखील शहिदांना मानवंदना देत ‘भारत माता की जय’ चा जयघोष केला. यावेळी चित्रकलेच्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, आमदार रवींद्र धंगेकर, सेवा मित्र मंडळ चे अध्यक्ष गणेश सांगळे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीण कुमार पाटील, विशेष शाखेचे उपायुक्त ए राजा, स्मार्तना पाटील, संभाजी कदम, विक्रांत देशमुख, वाहतूक शाखेचे एसीपी मुल्ला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, विनायक गायकवाड, सुरेंद्र माळाळे, सुनील माने, सोमनाथ जाधव, श्री हटकर, इनुस शेख, प्रशांत संडे, हनुमंत भोसले, तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन येथील इतर अधिकारी व अंमलदार वर्ग, पोलीस मुख्यालय पुणे शहर कडील पोलीस उपस्थित होते.
मुस्लिम महिला आपल्याला पाल्यांना घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पुणे पीपल्स बँकेने मुलांसाठी खाऊ दिला बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे रणदिवे व उपाध्यक्ष मिलिंद वाणी उपस्थित होते.स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी उपस्थितांना संविधान दिनाची शपथ दिली. यावेळी पुणे शहरातील विविध शाळांमधून विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते देशभक्तीपर व सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी शहिदांना चित्ररूपी श्रद्धांजली यावेळी अर्पण केली. प्रा. डॉ. मनोहर देसाई, प्रा. डॉ.गिरीश चरवड, विवेक खटावकर, संदीप गायकवाड, नितीन होले, वर्षा होले, प्रा. विनोद महाबळे, जितेंद्र जामादार, शेखर देडगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. उपक्रमाच्या संयोजनामध्ये मंडळाचे तन्मय तोडमल, अमर लांडे, उमेश कांबळे, सचिन ससाणे, विक्रांत मोहिते, पराग शिंदे, मीत नानावटी, नमन कांबळे, चेतन पवार, विशाल भोसले यांनी सहभाग घेतला. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले.
निकाल (अनुक्रमे – प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ)इयत्ता १ ली व २ री – आरुष सय्यद, माहिरा काशीद, आनंदी सवडे, शर्व तरलगट्टी, गंधाली ढमाळइयत्ता ३ री व ४ थी – काव्या खामकर, कावेरी तायडे, श्रीमयी वाडेकर, तन्मय शिंदे, तेनुल पवारइयत्ता ५ वी ते ७ वी – मोईन शेख, वैष्णवी घडशी, सिद्धी धुमाळ, गणश्री बांदलइयत्ता ८ वी ते १० वी – अनुष्का कडू, संस्कार पिसे, झेबा शेख, प्रियंजना पालखुला गट – ओमकार घुगे, यश नागरे, निसर्ग लोहार