सुधृद मानसिक व शारीरिक अयोग्यासाठी मैदानी खेळ खेळणे महत्वाचे: हरभजन सिंग
Pune: जगातील कोणतीही शाळा किंवा महाविद्यालय जे शिकवू शकत नाही त्या गोष्टी खेळातून शिकायला मिळतात. पराजयाने खचून न जात नव्या उमेदीने परत कसे उभे राहायचे त्यासाठी लागणारे धैर्य केवळ खेळातून शिकायला मिळते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू हरभजन सिंग यांनी एल्प्रो इंटरनॅशल स्कूल तर्फे आयोजित तिसऱ्या स्पोर्ट फेस्टिवल मध्ये केले.
ते पुढे म्हणाले, “सध्या मोबाईल चे प्रस्थ खूप वाढले आहे व सर्व लहानमुले मोबाईल वर स्पोर्ट खेळणे पसंत करतात परंतु माझे सर्व पालकांना असे आवाहन आहे की त्यांच्या पाल्यास कोणताही एक मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे. खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल तर्फे अशा प्रकारच्या फेस्टिव्हल चे आयोजन दरवर्षी करण्यात येते यामुळे मुलांचा खेळाकडे ओढा वाढेल, मी एल्प्रो शाळेचे यासाठी मनापासून कौतुक करतो.”
एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, सर्वांगीण शिक्षणासाठी वचनबद्ध असलेली एक अग्रगण्य संस्था आहे ते दरवर्षी स्पोर्ट फेस्टव्हल चे आयोजन करत असतात यावर्षी या फेस्टव्हल च्या ग्रँड फिनाले साठी व बक्षीस वितरणासाठी सुप्रसिद्ध वर्ल्ड कप विजेते क्रिकेटपटू श्री हरभजन सिंग प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील लुटला.
या क्रीडा महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग घेतला व दहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमात आपले क्रीडा कौशल्य दाखवले. 10 दिवस चालणार्या या महोत्सवात प्रत्येक विद्यार्थ्याने बुद्धिबळ, कॅरम, तिरंदाजी, टेबल टेनिस आणि बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, टग ऑफ वॉर आणि थ्रो बॉल यांसारख्या खेळांमध्ये भाग घेतला.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. अमृता वोहरा – संचालिका प्राचार्य, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल म्हणाल्या, “गेल्या 2 वर्षांप्रमाणे या वर्षीही आमचा क्रीडा महोत्सव भव्यदिव्य ठरला. विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि सांघिक कार्याच्या भावनेला मूर्त स्वरूप देत, अपवादात्मक प्रतिभा दाखवली. तसेच युवा पिढीसाठी प्रेरणा असलेले क्रिकेटर हरभजन सिंग आमच्या विनंती ला मान देऊन उपस्थित राहिले यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. हिंजवडी फेज २ मध्ये एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल ची नवीन शाखा लवकरच सुरु होत आहे. ही शाळा २०२४-२५ मध्ये कार्यरत होईल.
एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल ही पीसीएमसी, पुणे येथे स्थित एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे जी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाचे पोषण करणारे सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे.शैक्षणिक आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमधील उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करणारी पुरस्कार-विजेती संस्था, शाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना वेगाने विकसित होत असलेल्या जगात यश मिळवण्यासाठी तयार करण्याचे आहे.