देश-विदेशपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषव्यवसायीक

हिट अँड रन व ईतर मागण्यासाठी  देशभरातील ड्रायव्हर देखील दिल्लीत धडकणार : बाबा कांबळे

26 फेब्रुवारी रोजी जंतर-मंतरवर करणार आंदोलन

पुणे : चालक मालकांसाठी राष्ट्रिय आयोगाची स्थापना करणे. वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे. ड्रायव्हर दिवस घोषित कारा हिट अँड रन कायदा मागे घ्यावा या मागण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी देशभरातील चालक-मालक दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन छेडणार असल्याची माहिती ऑटो, टॅक्सी, टेम्पो, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. 26 फेब्रुवारी रोजी या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली. या वेळी, मासाहेब कॅब संघटनेचे अध्यक्ष वर्षाताई शिंदे,पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे साहेब,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष महंमद भाई शेख कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील उपाध्यक्ष अर्शद अन्सारी विल्सन मस्के मोहसीन शेख गोविंद रेड्डी माँसाहेब कॅप संस्था संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश काटकर नाथाभाऊ फुंदे अर्जुन फुंदे ज्ञानेश्वर बोडके सदाशिव गुडघे अभिषेक कदम अविनाश पाटील अनिकेत तिहिले दत्तात्रेय डफळ विश्वजीत शिंदे सागर सावंत काँग्रेस कमिटी रिक्षा युनियन अध्यक्ष दिलीप लोळगे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे उपाध्यक्ष संजय चव्हाणउपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, चालकांच्या विविध रखडलेल्या मागण्यांवर जनजागृती करण्यासाठी नुकतेच देशव्यापी ड्रायव्हर जोडो अभियान राबवण्यात आले. अभियानाला देशभरातील चालक-मालकांनी मोठा प्रतिसाद दिला. पंजाब, ओडीसा,कर्नाटक,तेलगणा अंद्रा प्रदेश, या राज्यांसह इतर अनेक राज्यांमध्ये चालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सभेच्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी जमत आहे. दिल्ली येथील जंतर मंतर वर जोरदार आंदोलनाची तयारी सुरू केली असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

सध्या आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. त्याच धर्तीवर देशभरातील चालक मालक देखील दिल्लीत धडकणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारने चालक मालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करावी. मार्ग काढावा. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

चौकट : 26 रोजी देशव्यापी आंदोलन असल्या मुळे व देशांतील सर्व संघटना सहभागी होत असल्यामुळे,20 फेब्रुवारी रोजी काही बोगस संघटनांनी रिक्षा कॅब बंद जाहिर केले आहे. या बंद मध्ये आम्ही सहभागी होणार नाही पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बहुसंख्य कॅब व रिक्षा सुरू राहतील, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली. ज्या संघटनेने बंद पुकारला ती संघटना बोगस असून त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांनी आतापर्यंत गुंडगिरी प्रवृत्ती करून रिक्षा चालकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले असल्याने त्यांचा पूर्व इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा अशी मागणी केली असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!