आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

आदित्य बिर्ला ग्रुप रंग उद्योगक्षेत्राच्या क्षमतेमध्ये ४०% वृद्धीसह या उद्योगामध्ये नवी क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज

बिर्ला ओपसचे उद्दिष्ट ३ वर्षात कमावणार १०,००० कोटी रुपयांचा रेव्हेन्यू

मुंबई: आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन, श्री कुमार मंगलम बिर्ला यांनी “बिर्ला ओपस” या सजावटीच्या रंगांच्या नवीन ब्रँडअंतर्गत उत्पादने व सेवा सुरु करत असल्याची आज घोषणा केली. संपूर्ण क्षमतेनिशी संचालन करून पुढील ३ वर्षात १०,००० कोटी रुपयांचा एकूण रेव्हेन्यू कमावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. अशाप्रकारे आदित्य बिर्ला ग्रुपने १०,००० कोटी रुपयांच्या वेगाने विस्तार पावत असलेल्या आणि तब्बल ८०,००० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेली भारतातील सजावटीच्या रंगांच्या बाजारपेठेत पदार्पण केले आहे, ज्यामध्ये या समूहातील प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड १०,००० कोटी रुपयांच्या अभूतपूर्व आगाऊ गुंतवणुकीसह बिर्ला ओपस हा व्यवसाय स्थापित करत आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेयरमन श्री कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, “आजचा भारत गतिशीलता, धाडस आणि क्रांतिकारी वृत्तीने भरलेला आहे. आमचा नवीन रंग उद्योग बिर्ला ओपस याच भारताचे प्रतिबिंब आहे. बांधकाम सामग्री इकोसिस्टिमबद्दल आदित्य बिर्ला ग्रुपला असलेली सखोल समज, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव यामुळे आम्ही एका अनोख्या सुविधाजनक स्थानी आहोत. म्हणूनच बिर्ला ओपस रंग उद्योगक्षेत्राच्या सध्याच्या क्षमतेमध्ये ४०% वृद्धीसह या उद्योगामध्ये नवे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

आज आम्ही कारखाने, संचालन, उत्पादने आणि सेवा हे सर्व एकाच वेळी जितक्या मोठ्या प्रमाणात सुरु करत आहोत, तितक्या मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवरील कोणत्याच रंग कंपनीने आजवर केलेले नाही.”

श्री बिर्ला पुढे म्हणाले, “बिर्ला ओपसकडे आदित्य बिर्ला ग्रुपने सुरु केलेले एक मोठ्या प्रमाणावरील स्टार्ट-अप म्हणून पाहिले गेले पाहिजे. स्टार्ट-अपची चपळता, ऊर्जा आणि काटकसरी वृत्ती तसेच प्रतिष्ठित व गतिशील समूहाची ताकद, विश्वसनीयता आणि ब्रँड मजबुती यांचा अनोखा मिलाप बिर्ला ओपसमध्ये आहे.” बिर्ला ओपसची उत्पादने मार्च २०२४ च्या मध्यापासून पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये आणि जुलै २०२४ पर्यंत भारतातील शहरांमधील १ लाख लोकसंख्येपर्यंत पोचतील. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ६००० पेक्षा जास्त शहरांमध्ये वितरणाचा वेगवान विस्तार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रंगांच्या ब्रँडने संपूर्ण भारतभरात केलेली ही आजवरची सर्वात वेगवान आणि सर्वात व्यापक सुरुवात ठरणार आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेयरमन श्री कुमार मंगलम बिर्ला यांनी ‘बिर्ला ओपस’ ब्रँड लोगोचे देखील अनावरण केले.

‘बिर्ला ओपस’ हे नाव अतिशय विचारपूर्वक ठेवण्यात आले आहे, यातील ‘बिर्ला’ हा शब्द आदित्य बिर्ला ब्रँडचे प्रमुख वैशिष्ट्य असलेली विश्वसनीयता दर्शवतो. तर सौंदर्य दर्शवणारा ‘ओपस’ हा शब्द लॅटिन वाक्प्रचार “मॅग्नम ओपस” मधून घेण्यात आला असून त्याचा अर्थ महान कलाकृती असा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!