देश-विदेशपुणेराजकीयविशेष

शिवाजी माधवराव मानकर यांनी भाजप श्रेष्ठींकडे मागितली पुण्यातून लोकसभेची उमेदवारी

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी

पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी (सीएसआर) निधीतून शाळांचे सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली.

सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मानकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले. ‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असेही ते म्हणाले. प्रसंगी ऍड. मंदार जोशी, अमित जाधव, ऍड. एन. डी. साबळे, अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.

शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, “माझा जन्म नारायण पेठेतला असून, बालपण व माझी कारकीर्द पुण्यात बहरली आहे. पुणे शहराच्या समस्यांची मला जाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात फिरत असताना शहराचा सर्वांगीण विकास कसा असायला हवा, याची अनेक आदर्श उदाहरणे पाहिली आहेत. विकासाची ही आदर्श मॉडेल्स आपण पुण्यातही राबवू शकतो. त्याचे सर्व नियोजन आपण करत आहोत. येणाऱ्या काळात पुण्यासाठी चांगले प्रकल्प, उद्योग आणण्यासाठी, तसेच इथे असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लोकसभेत जाण्याची संधी मिळणे गरजेचे आहे.”

“भाजपसोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे. तसेच २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने व देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला ऐनवेळी येवला मतदारसंघातून विधानसभा लढण्याची संधी दिली. कोणतीही पूर्वतयारी नसताना येवल्यात तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांना तुल्यबळ लढत दिली होती. माझ्यातील लढवय्या नेतृत्व व मला मिळणारा सर्वपक्षीय पाठिंबा यामुळे सर्वच सहा मतदारसंघात आम्हाला मताधिक्य मिळू शकेल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्याला पुण्याच्या लोकसभेची उमेदवारी देऊन पुणेकरांच्या सेवेची संधी देईल, असा विश्वास वाटतो,” असे मानकर यांनी नमूद केले.”

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यावर, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासह मेट्रोचा विस्तार, रिंग रोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न, स्वच्छ शहर व महापालिकेच्या शाळांचे सक्षमीकरण, पुण्याचा आत्मा असलेल्या मुळा-मुठा नदीचे संवर्धन, केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिला, तरुण यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासह इतर अनेक योजनांवर आपण करत आहोत.

पुण्यात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे हजारो कोटींचा सीएसआर निधी उपलब्ध असतो. हा सीएसआर निधी, लोकांचा सहभाग यातून अनेक प्रकल्प व उपक्रम मार्गी लावण्यावर आपला भर असणार आहे,” असे मानकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!