Pune: जेएसपीएम विद्यापीठाचा पहिला स्थापना दिवस विविध कार्यक्रमांसह साजरा झाला. या प्रसंगी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. या निमित्ताने “आंत्रप्रेनेक्स” या स्टार्ट-अप फेस्ट चे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यापीठाच्या “जर्नल ऑफ इनोव्हेशन अँड ट्रान्सलेशनल रिसर्च” (JITR) आणि IMPRINTS – इयरबुक 2024 चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या समारंभामध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांना राष्ट्र आणि मानवतेसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जेएसपीएम विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेचा “Epidemiology Excellence Award for Combatting Communicable Diseases” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मान्यवर पाहुण्यांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नाथ इंडस्ट्रीजचे फाउंडर चेअरमन, श्री. नंदकिशोर कागलीवाल, विशेष अतिथी म्हणून डॉ. पी. पी. विटकर, माजी प्राचार्य आरएससीओई, आणि डॉ. एस. बी. निमसे माजी कुलगुरू, लखनौ विद्यापीठ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला माननीय प्रा. डॉ. तानाजी सावंत, कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महाराष्ट्र सरकार आणि संस्थापक सचिव, जेएसपीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, डॉ. रवी जोशी, अध्यक्ष, आणि प्रो. बी.बी. आहुजा, कुलगुरू, जेएसपीएम विद्यापीठ पुणे, शिक्षण तज्ज्ञ श्री. अजित थिटे, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. विशाल चौधरी, जेएसपीएम समूहाचे डायरेक्टर श्री. अनिल भोसले, डायरेक्टर श्री. कमलाकर उन्हाळकर, डायरेक्टर श्री. कन्हैय्यालाल बारबोले यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या उद्योजकता आणि नवोन्मेषाचे प्रतीक असलेल्या “EntrepreNex” या स्टार्ट-अप फेस्टच्या उद्घाटनाने वर्धापनदिनाची सुरुवात झाली. यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेचा पारंपारिक सोहळा पार पडला.सकाळच्या सत्रात प्रमुख व्यक्तींचा सत्कार करण्यात आला, त्यात श्री. नंदकिशोर कागलीवाल आणि डॉ. पी. पी. विटकर यांनी माननीय प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून सन्मान स्वीकारला. तर डॉ. एस. बी. निमसे यांनी प्रा. बी. बी. आहुजा यांच्याकडून सन्मान स्वीकारला. याप्रसंगी, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा सत्कार, डॉ. रवी जोशी यांनी केला.
उपस्थितांना संबोधित करताना, कुलगुरू प्रा. बी.बी. आहुजा यांनी सर्वांचे स्वागत केले. आपल्या उदघाटनपर भाषणात, “विद्यापीठाच्या नवकल्पना आणि संशोधनाला चालना देण्याच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला, NEP च्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केले आणि जेएसपीएम विद्यापीठाच्या संस्थापक तत्त्वाचा पुनरुच्चार करून, “आम्ही जे काही आणि सर्व काही करतो ते उत्कृष्टते भोवती फिरते” असे प्रो. आहुजा यांनी सांगितले.
त्यानंतर डॉ. रवी जोशी यांचे अध्यक्षीय भाषण झाले, त्यांनी संस्थेचा प्रवास आणि भविष्यातील प्रयत्नांची रूपरेषा स्पष्ट करताना, सर्वांप्रती सहानुभूती, संस्कृती आणि दृष्टीकोन यासारख्या विद्यापीठाच्या आदर्शांना त्यांनी महत्त्व दिले आणि विद्यार्थ्यांना ते अनुसरण्याची प्रेरणा दिली.विद्यापीठाच्या जर्नल ऑफ इनोव्हेशन अँड ट्रान्सलेशनल रिसर्च (JITR) आणि IMPRINTS – इयरबुक 2024 चे दिमाखदार प्रकाशन झाले. या प्रसंगी बोलताना डॉ. कमलकिशोर उके, डायरेक्टर रीसर्च, जेएसपीएम विद्यापीठ यांनी विद्यापीठाच्या जर्नल, विद्यापीठाचा संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्टार्ट-अप फेस्ट 2024 विषयी माहिती सांगितली. डॉ. रमण गंगाखेडकर यांचा सत्कार, साथीचे रोग आणि संसर्गजन्य रोग यांच्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करणे, हे या उत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
डॉ. गंगाखेडकर यांच्या कार्याचा भारतातील सार्वजनिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या उत्तरात बोलताना त्यांनी युवकांना स्वतःची कोणाशीही तुलना व करण्याचा किंबहुना शक्य असेल तेवढी दुसऱ्यांची मदत करण्याचा सल्ला दिला. कोणताही पुरस्कार अपेक्षा आणि जबाबदाऱ्या वाढवतो. सर्व भारतीयांनी मनाचा निग्रह करून काम केल्यास आपला भारत देश विकसित होण्यास वेळ लागणार नाही. मला पद्मश्री पुरस्कार हा सामान्य लोकांच्या विनंतीवरून देण्यात आला आहे. मी व्यक्तिशः कधीही कोणत्याही पुरस्काराच्या अपेक्षेने कोणतेही काम केले नाही. प्रमुख पाहुणे श्री नंदकिशोर कागलीवाल यांच्या भाषणात त्यांनी, अथक परिश्रम करण्याचे महत्त्व विशद केले. श्री. कागलीवाल यांनी उद्योजकतेवर भर दिला.
“अटल समर्पण आणि चिकाटीने व्यक्ती केवळ यशस्वी स्टार्टअप स्थापित करू शकत नाही तर जीवनातील कोणतेही ध्येय देखील साध्य करू शकतात.” असा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिलाप्रा. डॉ. तानाजी सावंत, कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महाराष्ट्र सरकार आणि जेएसपीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक सचिव यांनी आपल्या प्रेरक आणि प्रेरणादायी भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या रिमोट वर्कच्या संकल्पनेचा मुद्दा प्रभावीपणाने मांडला. भारताच्या विकासाचा पाया हा ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
” ग्रामीण भागात विशेष शेतकरी विमानतळ ” ची दूरदर्शी कल्पना मांडली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्दिष्ट शेतक-यांना लक्षणीयरीत्या विस्तारित बाजारपेठेपर्यंत अधिक सुलभता प्रदान करून, त्यांच्या कामकाजात सुविधा आणि कार्यक्षमता वाढवून कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणे आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच, नवनवीन कल्पना साकारणाऱ्या स्टार्ट अप्स ना विद्यापीठ शक्य असेल तितके साहाय्य करेल असे त्यांनी या प्रसंगी जाहीर केले.श्री विशाल चौधरी, रजिस्ट्रार, जेएसपीएम युनिव्हर्सिटी पुणे, यांनी सर्व सहभागींचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.