आरोग्यपुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषसामाजिक

महिलांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला दिनानिमित्त शांतीदूत तर्फे 'सेवा गौरव पुरस्कार २०२४' प्रदान

पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवारातर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २०२४’ तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ३ मार्च रोजी युनिटी हॉस्पिटल, औंध येथे आयोजित करण्यात आले होते. १२७ महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शबिराचा लाभ घेतला. हिमोग्लोबिन वाढीसाठी कोणता आहार व औषधे घ्यावीत या विषयी तज्ञा कडून मार्गदर्शन देखील करण्यात आले. अक्षय ब्लड बँकच्या सहाय्याने ३४ रक्त पेशव्यांचे संकलन झाले. त्याच प्रमाणे विविध क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सेवा रत्न गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. सन्मान चिन्ह, मानपत्र व उपरण अशे या सन्मानाचे स्वरूप होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. भवानी राकेश U.K.(मिसेस युनायटेड), प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, उद्योजिका सुप्रिया बडवे, सौ.सुनीता राजे पवार (संस्कृती प्रकाशन पुणे), डॉ. विट्ठल जाधव विशेष पोलिस महानिरीक्षक (से. नि.), शांतीदूत परिवाराच्या संस्थापिका सौ. विद्याताई विठ्ठल जाधव, युनीटी हॉस्पिटलच्या डॉ. प्रिती काळे, डॉ. अमित काळे, राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव, उद्योजक हर्षल गौंड पाटील प्रल्हाद साळुंखे (मुख्य अभियंता MSEB से.नि.), डॉ. वेंकट साई अभिनेत्री रोहिणी कोलेकर, सुरेश सकपाळ, विजया नागटिलक, मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.

यंदाचे ‘शांतीदूत सेवारत्न गौरव पुरस्काराचे’ मानकरी –

प्रगती नाईनवरे (पोलीस सेवा), सुमती नलावडे (दीव्यांग सेवा), सीमा दळवी(पोलीस सेवा), माया नवले(महीला सबलीकरण), डॉ. पूनम शाह (वैद्यकीय सेवा), शर्मिला सय्यद (सामाजिक सेवा), ज्योती चव्हाण(क्रीडा क्षेत्र), शोभा बल्लाळ(सामाजिक सेवा), रेखा साळुंखे( पोलीस निरीक्षक से. नि.), एड. फरहिन खान -पटेल( सामाजिक), दीक्षा गाडे (कलाक्षेत्र), प्रणाली रांजणे (अभिनय), गीता पाटील (क्रीडा), सविता घाटवळ(शैक्षणिक कार्य), भाग्यश्री नवटाके (आयपीएस), मंगला भोसले(सामाजिक सेवा), प्राजक्ता कोळपकर(सामाजिक सेवा), सुनीता झांबरे( सामजिक), देवता देशमुख (दीव्यांग सेवा), डॉ. सिमरन शाह ( वैद्यकीय सेवा)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृषाली जाधव यांनी केले, सूत्रसंचालन ह.ब.प. विजय बोत्रे तर आभार मोनिका भोजकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!