शिवभक्तांसाठी आनंद गोयल यांच्या वतीने फराळाचे वाटप
२० टन खिचडी चे वाटप; उपक्रमांचे यंदा तेरावे (१३) वर्ष

पुणे, येरवडा: महाशिवरात्री निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांच्या वतीने प्रत्येक शिवभक्तांसाठी फराळाचे वाटप आज सकाळी ९ ते रात्री १२ वाजे पर्यंत करण्यात आले असून साधारण ७० ते ८० हजार भक्तांनी सेवेचा लाभ घेतला. यंदा उपक्रमाचे हे तेरावे वर्ष होते. शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, पृथ्वीराज सुतार, पी.आय. संतोष पाटील, आमदार सुनील टिंगरे, मा. आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख प्रशांत जगताप, अजय परदेशी, बॉबी टिंगरे, राजेंद्र शिंदे, महीला आघाडीच्या अमृता पठारे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, राजू ठोंबरे, मकरंद पेटकर, संजय वाल्हेकर, निलेश जठार, शशी देवकर, प्रमोद पवार, किशोर पाटील, आबा खलसे, बाळासाहेब खांदवे, संजय मोजे, विकी धोत्रे, तारीख शेख, दशरथ मटवणकर, राजेंद्र शिरसाठ, निता अग्रवाल, करुणा घाडगे प्रवीनी भोर, करुणा घाडगे रमेश सकट, नाना नलावडे, अनिल श. टिंगरे, आरिफ शेख, शरद गुप्ते, प्रशांत मोरे, संतोष तापकीर, प्रकाश निकम, आशिष चावरिया, प्रकाश शेंडगे, अजित शास्त्री, किशोर टिंगरे, आरून कानस्कर, दीपक चावरिया, भारत जाधव, किशोर बराथे, रत्नकांत ढवन, यांच्यासह शकडो शिवसैनिक, महीला पदाधिकारी उपस्थित होते.
फूड परवाना, आरोग्य परवाना घेऊन पूर्णतः हायजेनिक व आणि उत्तम खाद्य सामग्रीचा उपयोग करून वीस टन खिचडी फराळ तय्यार केला गेला होता. सोबतच सह्याद्री हॉस्पिटल च्या सहाय्याने शिव भक्तांसाठी आरोग्य सेवा देखील उपलब्ध करून दिले जाते अशी माहिती आयोजक आनंद गोयल यांनी दिली. आलेल्या मान्यवरांनी गोयल यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी, दिपाली गायकवाड यांनी केले. दिवसभराच्या आयोजनमध्ये पोलीस विभागाचे विशेष सहकार्य मिळाले.