Uncategorized

पुणे दर्शन बस सेवत फुले वाडा / समता भूमी थांबा घ्यावा या साठी श्री संत सावता माळी संघाचे निवेदन

पुणे: विद्येचे माहेरघर पुणे च्या शैक्षणिक दृष्टीने तसेच इतर जडणघडणीत महात्मा ज्योतीबा फुले दांम्पत्याचे मोठे योगदान आहे. परंतु नजर चुकीने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जी पुणे दर्शन बस चालु केली आहे. त्या पुणे दर्शन मध्ये महात्मा ज्योतीबा फुले यांची समता भूमी असावी . या मागणी साठी श्री संत सावता माळी संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक ३/४/२०२३ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ आयुक्त श्री. ओपप्रकाश बकोरीया यांना निवेदन देण्यात आले.

अरूण बबन भुकन (प्रदेशाअध्यक्ष व सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चाकण शहर संपर्क प्रमुख विशाल दुर्गाडे यांच्या संकल्पनेतून, पुणे जिल्हा महीला अध्यक्ष सौ.सुवर्णाताई दुर्गाडे, चाकण शहर संपर्क प्रमुख विशाल दुर्गाडे, पश्चिम महाराष्ट्र महीला संपर्क प्रमुख ॲड. सौ.जान्हवी संते (ताम्हाने), महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया अध्यक्ष नितीन बोराटे, भोर तालुका अध्यक्ष दत्तात्रय लोहमकर, पुणे शहर महीला उपाध्यक्ष सौ .सोनाली घोलप, पुणे शहर उपाध्यक्ष सतीश गुंजाळ, पुणे शहर विभाग प्रमुख सुधिर टीळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री ओमप्रकाश बकोरीया यांनी तत्काळ निर्णय घेऊन ११/४/२०२३ रोजी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी सर्व व्यवस्थापनाला सांगून पुणे दर्शन मध्ये समता भुमि हा थांबा असेल; असे लेखी आश्वासन दिले. तसेच प्रत्येक वर्षी ३जानेवारीला व ११ एप्रील रोजी पुण्यातील सर्व बस डेपो मधुन ऐक दिवसीय विशेष बस सेवा चालु ठेवन्यात येईल असे ही सांगितले. आपल्यासाठी खुप आनंदाची बातमी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!