Uncategorized

बागडपट्टीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित श्री हनुमान चालीसा पठण मोठ्या उत्साहात

अहदनगर: बागडपट्टीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने श्री हनुमान तालीम बागडपट्टी येथे श्री हनुमान चालीसा पठण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी आयोजक बागडपट्टीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दिलदार सिंग बीर यांच्यासह ठाकरे गट शहर प्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण ,माजी महापौर भगवान फुलसंदर ,माजी महापौर अभिषेक कळमकर ,नगरसेवक योगीराज गाडे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय झिंजे ,शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते ,शिवसेना संपर्कप्रमुख सचिन जाधव ,भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा ,गणेश तुम्मा आदि मान्यवर आणि भावीक फक्त नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते .

पुणे येथील गणेश तुंबा यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.नवी पेठ येथील पुरातन श्री राम मंदिरातील श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सुमधुर गायनातून हनुमान चालीसा पठण केलं . परिसरातील नागरिकांनी आणि भाविक भक्तांनी या हनुमान चालीसा पठण आणि भजन संस्थेचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!