पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

पुणे – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय दुसरी सरमिसळ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.यावेळी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर , पुणे मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, जिल्हाधिकारी तथा पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, मनुष्यबळ समन्वयक अधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघातील पुणे जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील १ हजार ३३९ मतदान केंद्रासाठी ६ हजार ५९४ आणि रायगड जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील १ हजार २२७ मतदान केंद्रासाठी ५ हजार ४४८, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या २ हजार १८ मतदान केंद्रासाठी ११ हजार १७६ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रासाठी ११ हजार ५८६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

या सरमिसळ प्रक्रीयेच्या माध्यमातून संबंधित विधानसभा क्षेत्रातील पथक निश्चित झाले असून विधानसभा क्षेत्रस्तरावरील दुसऱ्या सरमिसळ प्रक्रीयेत मतदान केंद्रासाठी पथक निश्चित होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!