“नाच गं घुमा” या मराठी चित्रपटाचा महिलांनी घेतला आनंद
पुणे बिझनेस क्लब आणि सयोग वेंचर्स च्या वतीने 1500+ तिकिटांची बुकिंग
Pune : नाच गं घुमा हा बहुचर्चित मराठी विनोदी-नाट्यचित्रपट नुकताच रिलीज झाला. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पठारे, मधुगंधा कुलकर्णी, सारंग साठ्ये, मायरा वायकूळ अशी चांगल्या कलाकारांची फौज आहे..मधुगंधा कुलकर्णी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून त्यांच्यासह स्वप्नील जोशी,शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
हा चित्रपट ट्रेलर पासूनच खूप प्रसिद्ध झालेला असून प्रदर्शनापूर्वीच याची विक्रमी तिकीट बुकिंग झाली घराघरातील गृहिणी आणि त्यांच्याकडे कामाला येणारी मदतनीस यांच्यातील जिवाभावाच्या नात्याची गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
पुणे बिझनेस क्लब आणि सयोग वेंचर्स च्या संस्थापिका-संचालिका सपना काकडे यांच्या ग्रुप द्वारे, नाच ग घुमा या चित्रपटाच्या 1500 पेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग झाली. साधारण दोन वर्षांपूर्वी झिम्मा-१ या चित्रपटाच्या निमित्ताने सपना काकडे यांनी मराठी चित्रपटांविषयी जनजागृती करण्याची सुरुवात पुणे शहर येथे केली. दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांच्याबरोबर चर्चा करून चित्रपटाचे उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि त्याविषयी जागृती करण्याविषयी पुढाकार सयोग वेंचर्स तर्फे घेतला जातो.
चित्रपटातील कलाकारांची चित्रपट गृहात प्रेक्षकांना झालेली भेट त्यांना एक सुखद धक्का देऊन जाते. या ग्रुपद्वारे सुप्रसिद्ध माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या चित्रपटानिमित्त पुणेकरांना विशेष भेट देऊन गेले. नाच ग घुमा चित्रपटातील कलाकारांनी सिटी प्राईड मल्टिप्लेक्स सातारा रोड पुणे येथे भेट दिली. ग्रुपमधील महिलांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त फेटा घालून थाटात कलाकारांचे स्वागत करण्यात आले. सेलिब्रिटी केक आर्टिस्ट नमिता छत्रे यांच्या चित्रपट विशेष केकने कलाकारांची मने जिंकली.
आकांक्षा ज्वेलर्सच्या संचालिका अनिता क्षिरसागर, व्हायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीज व जाधव चटणीवाले च्या संचालिका अश्विनी जाधव यांचे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य झाले.
‘मदतनिस’ या विषयावर हा चित्रपट असल्यामुळे त्याविषयीची एक विशेष स्पर्धा सयोग वेंचर्सच्या,स्मार्ट लेडीज या फेसबुक ग्रुप वर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची संकल्पना राजदुर्गा क्रिएशनच्या संचालिका अर्चना मसुरेकर यांची असून त्यांच्यातर्फे विजेत्यांना मुकुट,गिफ्ट आणि त्यांच्या मदतनिसांना साडी देण्यात आली.