संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरी व संविधानवादी कार्यकर्त्यांची बैठक
दिल्लीच्या रस्त्यावर संविधान जाळणार्यांवर मोदींनी कारवाई का नाही केली : सुनील केदार
पुणे : नरेंद्र मोदी आणि भाजपा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपवायचे आहे . आमच्याकडून संविधानाला कोणताही धोका नाही अशा प्रकारचे पंतप्रधानांचे वक्तव्य हे दिशाभूल करणारे आहे , मोदींना खरंच संविधानाबद्दल अस्था आणि प्रेम असते तर दिल्लीच्या रस्त्यांवर भारतीय संविधानाची प्रत जाणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली असती. या प्रकरणी वारंवार पाठपुरावा करून देखील साधी संविधान जाळल्याची साधू तक्रार देखील दाखल करून घेतली नाही त्यातच भाजपचे संविधान विरोधी मनसुबे स्पष्ट होत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ. सुनील केदार यांनी केले.
कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कार्यरत असलेल्या आंबेडकरी पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठक राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सुर्वेज बॅंन्क्युट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये वरिल मत केदार यांनी व्यक्त केले. यावेळी रिपब्लिकन जनशक्तीचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र शैलेंद्र मोरे , रिपब्लिकन युवा मोर्चाचे सुवर्ण डंबाळे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक जगताप , प्रियदर्शनी निकाळजे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन घोंगडे यांच्यासह माजी नगरसेवक नंदलाल धिवार , माजी महापौर रजनी त्रिभुवन , माजी नगरसेविका लताताई राजगुरू , माजी नगरसेवक राहुल तुपेरे , युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणव चव्हाण , नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे लुकस केदारी , एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख , काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जातीचे शहराध्यक्ष सुजित यादव , आदी मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते.
आंबेडकरी जनतेचे प्रेम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानावर असल्यामुळे आंबेडकरी मतांची कोणतीही विभागणी होणार नाही. संविधान धोक्यात असताना मतदानाच्या विभागणीचे मनसुबे असणाऱ्यांची निराशा होऊन काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मोठ्या फरकाने या निवडणुकीमध्ये विजयी होतील. असे प्रतिपादन राहुल डंबळे यांनी यावेळी केले.
दरम्यान आंबेडकरी चळवळीतील बहुतांश लोक हे भारतीय संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या प्रचारामध्ये आघाडीने सहभागी होत असून रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी सर्व आवश्यकते प्रयत्न करत असल्याचे यावेळी मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले.