पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

पीएस जिओपोर्टल’ निर्मितीमुळे मतदान केंद्र शोधणे झाले सोपे

पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाचा मतदारांच्या सोयीसाठी विशेष पुढाकार

पुणे: मतदारांना आपले मतदान केंद्र सहजरित्या शोधण्यासाठी व तेथे पोहोचण्यास मदत करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात पुणे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोजन केंद्र पुणेच्या (एमआरएसएसी) सहाय्याने विकसित ‘पी.एस. जिओपोर्टल’ मतदारांसाठी उपयुक्त ठरत आहे. मतदारांनी आपल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा आणि मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

या पोर्टलमध्ये बारामती, पुणे, शिरुर, मावळ व पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत सर्व विधानसभा मतदार संघांतील मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या सर्व मतदान केंद्रांचे एमआरएसएसी पुणेने जिओ टॅगिंग करुन ही प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये संगणकावर क्यूआर कोड किंवा https://mahabhumi.mrsac.org.in/portal/apps/dashboards/f804b371685d4b74ad6c34b37bd41c0c या युआरएल लिंकच्या किंवा https://rb.gy/rp0e0r या लघुलिंकच्या आधारे आपले मतदान केंद्राचे ठिकाण पाहता येईल.

मोबाईलवर https://mahabhumi.mrsac.org.in/portal/apps/dashboards/366148c2dff140efa5c6db2b69a52b0d या युआरएल लिंक किंवा https://rb.gy/2jqo87 या लघुलिंकच्या आधारे आपले मतदान केंद्राचे ठिकाण पाहता येईल.या पोर्टलवर मतदारास आपला विधानसभा मतदार संघ व त्यातील मतदान केंद्राचे नाव किंवा क्रमांक वापरुन त्याचे अचूक भौगोलिक स्थान नकाशावर आपल्यासमोर दिसेल व दिसलेल्या ठिकाणी क्लिक केल्यास आपल्याला मतदान केंद्राची माहिती प्रदर्शित होते.

यात रकाण्याच्या शेवटी डायरेक्शन व्ह्यू (Direction Veiw) वर क्लिक केल्यास आपणास आपण उभे असलेल्या ठिकाणापासून मतदान केंद्रापर्यंतचा जाण्याचा मार्ग दिसेल, असे एमआरएसएसी पुणेचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

मतदान केंद्रापर्यंत कसे पोहोचाल पीएस जिओ पोर्टलची लिंक क्लिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्राचे नाव निवडावे. मतदान केंद्रावर क्लिक केल्यानंतर मॅपवर निळ्या रंगाचे मतदान केंद्राचे लोकशन दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूस मतदान केंद्राचा तपशील येईल. त्यातील ‘डायरेक्शन’ समोरील व्ह्यू या शब्दाला क्लिक केल्यावर गुगल मॅपवार मतदान केंद्र शोधता येईल. पोर्टलची लिंक क्युआरकोडद्वारेही ओपन करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!