पुणेमहाराष्ट्रविशेष

मोग-यासह सुवासिक फुलांनी सजले महालक्ष्मी मंदिर

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्या वतीने आयोजन

पुणे : श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवीला परिधान केलेला मोग-याचा पुष्पपोशाख… मंदिराचा गाभारा व सभामंडपात विविधरंगी फुलांची आरास आणि मोग-याच्या लाखो सुवासिक फुलांना गंध अनुभविण्याकरिता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या हजारो फुलांची सजावट अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने करण्यात आली होती. निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने मोगरा महोत्सवाचे.

यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली. मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १०० किलो मोगरा, गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, तगर, झेंडू, कार्नेशियन, आॅर्किड यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर नैवेद्य देखील दाखविण्यात आला.

फुलांची आरास पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. ही आरास शुक्रवार, दि. १० मे रात्री ९.३० पर्यंत पाहण्यासाठी खुली असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!