पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

बिबाने पुण्यातील सर्वात मोठ्या स्टोरमध्ये कवियित्री मधुराणी गोखले व गिरीजा मराठे यांच्या समवेत साजरा केला फॅशन आणि संस्कृतीचा सोहळा

पुणे, जून, २०२४:  भारतातील आघाडीचा आणि अस्सल स्वदेशी फॅशन ब्रँड, बिबाने पुण्यातील टिळक रोडवरील आपल्या स्टोरमध्ये शानदार सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले होते. हे पुण्यामध्ये बिबाचे सर्वात मोठे स्टोर असून, डिझायनर आणि फेस्टिव्ह खरेदीसाठी फॅशन डेस्टिनेशन म्हणून नावाजले जाते. बिबाने या सोहळ्यामध्ये नामवंत कवियित्री मधुराणी गोखले व गिरीजा मराठे यांना आमंत्रित केले होते त्यामुळे फॅशन व साहित्य यांचा अतिशय अनोखा व सुंदर मिलाप यावेळी पाहायला मिळाला. कपड्यांची शान आणि काव्यात्मक मोहिनी यांच्या सुरेख संगमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, भारतीय संस्कृतीचा सन्मान करण्याच्या बिबाच्या आजवरच्या प्रयत्नांमध्ये हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

Oplus_131072

पुण्यामध्ये बिबाच्या सर्वात मोठ्या स्टोरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये स्टाईल आणि संस्कृती यांचा आनंद साजरा करण्यात आला, इतकेच नव्हे तर, पुण्यामध्ये बिबा ब्रँडसाठी देखील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. पुणे शहरामध्ये बिबाचे सर्वात मोठे स्टोर म्हणून हे स्टोर उत्कृष्ट फॅशन हमखास मिळेल असे ठिकाण म्हणून नावाजले जाते, ब्रँडच्या मूळ विचारांचे सार दर्शवणारा अनुभव याठिकाणी मिळतो.

सध्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये गारवा निर्माण करेल असे आकर्षक, नाजूक पॅटर्न्स व उत्कृष्ट शैली असलेले कलेक्शन बिबाने प्रस्तुत केले आहे.  यंदाच्या सीझनमध्ये बिबाने फक्त कलेक्शनच सादर केलेले नाही तर फॅशनमधील नावीन्य व वैविध्य यांचा आनंद देखील साजरा केला आहे. आधुनिक सुंदर डिझाइन्सपासून कालातीत क्लासिक्सपर्यंत या कलेक्शनमध्ये फॅशनप्रेमींच्या विविध आवडीनिवडींना पुरेपूर वाव देण्यात आला आहे.

या सोहळ्यामध्ये बिबाची नवनवीन कलेक्शन्स प्रदर्शित करण्यात आली, इतकेच नव्हे तर, स्टोरमधील विशाल कलेक्शन्स देखील हायलाईट करण्यात आली. लग्नसमारंभ आणि विशेष प्रसंगी परिधान करावयाच्या शानदार डिझायनर वेयरपासून सणसमारंभामध्ये वापरायच्या सुंदर ड्रेसेस आणि बिबा गर्ल्स कलेक्शनमधील आकर्षक ड्रेसेसपर्यंत, प्रत्येक खरेदीदाराच्या पसंतीस उतरतील असे ड्रेस याठिकाणी आहेत. बिबामधील कलेक्शनमध्ये कपडे तसेच विविध आऊटफिट्सवर शोभून दिसतील अशा ऍक्सेसरीजची वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मनमुराद खरेदीचा आनंद घेता येईल

बिबाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सिद्धार्थ बिंद्रा यांनी या कार्यक्रमाविषयी सांगितले, चोखंदळ फॅशनप्रेमींचे शहर पुण्यामध्ये बिबाचे वैशिष्ट्य मानली जाणारी शान आणि स्टाईल सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बिबा स्टोरला दिलेली प्रत्येक भेट एक आनंददायी अनुभव असतो, याठिकाणी ग्राहकांना नवनवीन ट्रेंड्स अनुभवता येतात, कालातीत क्लासिक्सचा आनंद घेता येतो आणि त्यांच्या व्यक्तिगत शैलीला अनुरूप असे कपडे मिळण्याचे समाधान मिळवता येते. फॅशन आणि संस्कृती यांचा मिलाप करून सोहळा साजरा करणे हा आमचा उद्देश होता.”

ते पुढे म्हणाले,पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात ४३ स्टोर्ससह, टिळक रोडवरील आमचे स्टोर अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून शहरातील फॅशनप्रेमींसाठी खात्रीशीर फॅशन डेस्टिनेशन आहे, बिबाच्या सिग्नेचर स्टाईलसह याठिकाणी त्यांच्या विविध आवडीनिवडी पूर्ण होतात. हा कार्यक्रम म्हणजे आमच्या ग्राहकांना त्यांचे वॉर्डरोब रिफ्रेश करण्याची आणि खऱ्या अर्थाने अनोखा अनुभव मिळवण्याची रोमांचक संधी ठरला.”

वेगाने वाढत असलेल्या भारतीय बाजारपेठेमध्ये व्यवसाय संधींचा लाभ घेण्यासाठी बिबाकडून सातत्याने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे कपड्यांच्या रिटेल सेगमेंटमध्ये या ब्रँडला एक आगळेवेगळे स्थान मिळाले आहे. बिबाची स्टोर्स अतिशय सुंदर डिझाईन केलेली असतात, भारतीय फॅशनची नवी व्याख्या बिबाने रचली आहे, त्याबरोबरीनेच ग्राहकांना आरामदायी वाटावे, आपलेपणाचा अनुभव मिळावा आणि सर्वोत्तम फॅशन मर्चन्डाईज निवडता यावे यासाठी देखील हा ब्रँड प्रयत्नशील आहे.

नामवंत कवियित्री मधुराणी गोखले व गिरीजा मराठे यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला साहित्यिक सौंदर्याचा साज चढवला गेला आणि हा खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक सोहळा ठरला. त्यांच्या कविता आणि बिबाच्या समर कलेक्शनची प्रस्तुती यामुळे वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले होते.

मधुराणी गोखले यावेळी म्हणाल्या, बिबाचे ठळक रंग, नाजूक डिझाईन कालातीत शान याचे मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. या ब्रँडमध्ये परंपरा आणि शैली यांचा सहज मिलाप आढळून येतो, त्यामुळे प्रत्येक महिलेला फॅशनमधून स्वतःला अभिव्यक्त करता येते. या सोहळ्यामध्ये सहभागी होणे माझ्यासाठी विशेष होते, टिळक रोडवरील स्टोरची भव्यता आणि येथील शानदार कलेक्शन्स यामुळे रंगत खूपच वाढली.”

गिरीजा मराठे म्हणाल्या, “या विशेष कार्यक्रमासाठी बिबासोबत सहयोग करणे माझ्यासाठी एक सन्मान होता. एक कवियित्री म्हणून माझा शब्दांच्या परिवर्तनात्मक शक्तीवर विश्वास आहे, शब्दांमधून सांस्कृतिक वारसा साजरा करता येऊ शकतो. बिबाने आम्हाला आमची कला प्रदर्शित करण्यासाठी मंच पुरवला, असे एक मोहक वातावरण निर्माण केले जिथे कविता आणि फॅशन यांचा मिलाप करून आमची ओळख मूल्ये प्रदर्शित करता आली.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!