पुणे बिझनेस क्लब तर्फे ‘पीबीसी प्रीमियर लीग 2024’ चे आयोजन
पीबीसी चॅम्पियन्स ने पीबीसी रॉयल्स संघाला ११ धावांनी पराभूत करून बनले विजेते
Pune : पुणे बिझनेस क्लब आयोजित, पीबीसी प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पीबीसी चॅम्पियन्स या संघाने पटकावले. पुष्पा स्पोर्ट अरेना, बिबवेवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत पीबीसी चॅम्पियन्स ने पीबीसी रॉयल्स संघाला ११ धावांनी पराभूत करून सोनेरी करांडकावर नाव कोरले.
सदर स्पर्धेचे मृणाल कौशल्य विकास सामाजिक संस्था प्रायोजक असून राजश्री नाले सह प्रायोजक होत्या. पुणे बिजनेस क्लब च्या संचालिका व संस्थापिका सपना काकडे यांनी क्लब द्वारे महिला उद्योजिकांसाठी व त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ दिले आहे. ग्रुप मधील सदस्यांचे एकमेकींशी मैत्रीपूर्ण संबंध वाढावेत यासाठी क्लब तर्फे विविध उपक्रम घेण्यात येतात; त्यापैकीच हा एक महिला क्रिकेट सामना अतिशय उत्साहाने संपन्न झाला.
सामन्याचे उद्घाटन सुषमाताई कोंडे, अश्विनी जाधव व अर्चना मसुरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आरव केक्स अँड बेक्स च्या स्नेहा जयपुरिया यांनी क्रिकेट थीम विशेष केक बनवला होता.उत्कृष्ट गेंदबाज म्हणून दीपिका जैन तर उत्कृष्ट फलंदाजाचा मान सोनाली सिन्हा यांनी मिळवला.
वुमन ऑफ द मॅच ने अनुक्रमे यामिनी दाहोत्रे, रश्मी महामुनी, व स्नेहल काळे यांना सन्मानित करण्यातआले असून, वुमन ऑफ द सिरीज ने ऋतुजा लिमये यांचा गौरव झाला तर सोनाली म्हैसकर मॅजिकल परफॉर्मर ठरल्या. विजेत्या गटाला आगम जेवेल्स बाय निलांबिका बसवराज यांच्याकडून फॉर्मिंग चांदीच्या फ्रेम देण्यात आल्या. शामल मोरे व गौरी चिंतामणी सामन्याचे गिफ्टिंग पार्टनर्स होते.
अंपायर तृप्ती देशमुख व अपर्णा देवलालीकर यांनी केले तर निवेदक योगिनी बागडे यांच्या कॉमेंट्री ने खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत केला. अंजली इथापे, प्रतिमा खांडेकर, गर्व मसुरेकर व अन्वी काकडे यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.