पुण्यामध्ये अपघाताची मालिका थांबवण्यासाठी कार्यवाही बाबत आयुक्तांना निवेदन
पुणे शहर हे दिवसेंदिवस खूपच वाहतुकीचे शहर होत आहे यामध्ये आपण जड वाहनांना महानगरपालिका हद्दीमध्ये बंदी केलेली आहे तरी देखील मोठमोठे डंपर महानगरपालिकेच्या मोठ्या गाड्या तसेच पी एम पी एम एल च्या प्रवासी वाहतूक असणाऱ्या मोठ्या गाड्या या रस्त्याने आपण पाहतो या सर्व गाड्यांच्या वाहतुकीची तपासणी फिटनेस सर्टिफिकेट हे सर्व व्यवस्थित असले पाहिजे परंतु पोलिसांकडून त्याची तपासणी होताना दिसत नाही.
मोठे डंपर हे राजरोसपणे परवानगी नसताना देखील आपल्याला शहरांमध्ये फिरताना दिसतात आज गंगाधाम चौकाजवळ एका दुर्दैवी घटनेमध्ये एका महिलेला आपल्या जीवास मुकावे लागले असे रोजच पुणे शहरांमध्ये अपघात होताना आपण पाहत आहोत व यामुळे संपूर्ण परिवार उध्वस्त होतात हे आपण पाहत आहात.
कृपया आपण स्वतः वाहतूक विभाग व आरटीओ यांची संयुक्तपणे एक महिन्याची मोहीम पुणे शहरात राबवावी व पुणेकरांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यास मदत करावी ही कळकळीची विनंती अशे निवेदन प्रशांत गांधी (चिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले.