बिबवेवाडी: ७ व्या ‘पुणे शॉपिंग फेस्टिवल’ला पुणेकरांनी खरेदीचा आनंद घेत अनेक बक्षीसे, लकी ड्रॉ व खाउगल्लीचा पुरेपूर आनंद घेतला. प्रसंगी “बाई ग” या आगामी मराठी चित्रपटाचे कलाकारांबरोबर ट्रेलर सादरीकरण, बाई ग- सिग्नेचर स्टेप वर नृत्य, व नमिता छत्रे यांचा चित्रपट स्पेशल केक कापून चित्रपटाविषयी विशेष माहिती देण्यात आली.
यावेळी पुणे शॉपिंग फेस्टिवल’च्या आयोजिका व पुणे बिझनेस क्लब ‘च्या संचालिका सौ. सपना काकडे, चित्रपट दिग्दर्शक पांडुरंग जाधव, अभिनेत्री दिप्ती देवी, सुकन्या कुलकर्णी, नम्रता गायकवाड, नेहा खान, निर्माते यांच्या सह एम.टी.एम चे सिद्धार्थ असरपोटा, डॉ.दिप्ती वाघमारे, महीला उद्योजिका व ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे बिझनेस क्लब तर्फे या चित्रपटाचे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रत्येकाला दंताळे ज्वेलर्स यांच्या कडून चांदी मिक्स जोडवी किंवा एक ग्रॅम सोन्याच्या नथीचे कुपन मिळणार आहेत. सदर शॉपिंग महोत्सवाचे आयोजन पुणे बिझनेस क्लब ने तर पर्ली फॅशन स्टोअर ने प्रायोजित केले होते. पुण्यातील, बिबबेवाडी जवळ असलेल्या महा ट्रेड मार्केट (महाराष्ट्रातील सर्वात मोठा ट्रेड मार्केट) मध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले असून यामध्ये पुणेकर ग्राहकांना खरेदी बरोबरच वेगवेगळे उपक्रम आणि संपूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर असलेल्या विविध गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इशा ब्युटी वर्ल्डच्या संचालिका स्नेहल काळे यांच्याकडुन सुंदर नेलआर्ट केले गेले.
‘मिस्सी एन बेबी’ या प्रीमियम स्टोअर मध्ये बंपर लकी ड्रॉ होता यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला सोन्याची नथ दिली गेली, स्टोअरच्या संस्थापिका बोस्की जैन यांचे प्रदर्शनाला विशेष सहकार्य देखील लाभले होते. रूपाज क्रिएशनच्या संचालिका शामल मोरे व लोकलसे या ॲपचे संस्थापक श्रीकार दातार या प्रदर्शनाचे सहप्रयोजक होते.