राजू विटकर यांची शिवसेना झोपडपट्टी सेना पुणे शहर प्रमुख पदी नियुक्ती
पुणे: डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असलेले शिवसैनिक राजू विटकर यांच्यावर पुणे शहर झोपडपट्टी सेनेची जवाबदारी दिली असून संबंधित नियुक्तीचे पत्र आज गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विटकर यांना देण्यात आले.
वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून पत्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवणीचा प्रचार प्रसार तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा मायना सदर पत्रात नमूद केला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर राजू विटकर म्हणाले, जरी पुणे शहर हे स्मार्ट शहराच्या यादीत समाविष्ट असले तरी शहरामध्ये अनेक झोपडपट्या देखील आहेत. हजारो कुटूबिय येथील रहिवासी असून त्यांचे मूलभूत प्रश्न आज देखील सुटले नाही. सदर विषयावर वाचा फोडण्यासाठी त्यांना वर्तमान शिंदे सरकार व शिवसेना पक्षाच्या वतीने कश्या पद्धतीने न्याय हक्क देता येईल या दृष्टीने प्रयत्न करेल.