देश-विदेशपुणेमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

टाटा टेक्नोलॉजीजने त्याच्या #Reignite अभियानासाठी ओरिएंटेशन दिवस आयोजित केला

Pune, India, 20 February 2024: अभियांत्रिकी क्षेत्रातील जेंडर डायव्हर्सिटी/लैंगिक विविधता वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवांमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजने (BSE: 544028, NSE: TATATECH), #Reignite कॅम्पेनसाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी ओरिएंटेशन डे आयोजित केला आहे. गेल्या महिन्यात सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, विशेषत: करिअरच्या विश्रांतीनंतर पुन्हा कर्मचारी वर्गात प्रवेश करू इच्छिणाऱ्या महिला अभियंत्यांसाठी आहे.

#Reignite कॅम्पेनच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे 300 नोंदी आल्या आणि त्यातून 45 महिला अभियंत्यांची निवड करण्यात आली.

सुरुवातीला विविध तांत्रिक निकषांच्या आधारे आणि उपलब्ध भूमिकांसाठी लागणाऱ्या त्यांच्या कौशल्यांचे परीक्षण केल्यानंतर 90 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यानंतर, त्यांच्या अनुभवाचा विचार करता 45 उमेदवारांची निवड करण्यात आली. ओरिएंटेशन दरम्यान, उमेदवारांना त्यांच्या करिअरच्या पुन:प्रवेश प्रवासासाठी तयार करण्यासाठी मुलाखत आणि रेझ्युमे लेखन टिप्स देण्यात आल्या. तसेच पॅनेल चर्चा आणि विविध सत्रे आयोजित केली गेली. गट मार्गदर्शन सत्रांनी सहभागी उमेदवार आणि टाटा टेक्नॉलॉजीजच्या प्रतिनिधींमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि नेटवर्किंगसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याशिवाय, त्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. त्यानंतर डिजिटल अनुभव प्रयोगशाळेसह कॅम्पसचा सर्वसमावेशक फेरफटका केला गेला आणि कंपनीच्या पायाभूत सुविधा आणि प्रक्रियांशी परिचित करण्यात आले.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या लीडर्सनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि मौल्यवान माहिती शेअर केली. सविता बालचंद्रन, मुख्य वित्तीय अधिकारी, यांनी टाटा टेक्नॉलॉजीजमधील प्रगतीच्या संधींबद्दल चर्चा केली आणि त्यांच्या वैयक्तिक प्रवासाची झलक शेअर केली. संतोष सिंग, EVP आणि ग्लोबल हेड – मार्केटिंग आणि बिझनेस एक्सलन्स, यांनी कंपनीचा परिचय, तिचा इतिहास आणि डायव्हर्सिटी, इक्विटी आणि समावेशन (DEI) या बद्दल महत्वाची माहिती दिली. 

अंजली बालगोपाल, जनरल काऊंसेल यांनी टाटा टेक्नॉलॉजीज योग्य एम्प्लॉयर कशी आहे आणि ती कशामुळे डायव्हर्सिटी चॅम्पियन आहे यावर प्रकाश टाकला.

ऑरिएंटेशननंतर, हे 45 उमेदवार निवड प्रक्रियेच्या स्टेज 2 पर्यंत पुढे जातील आणि त्यांना टाटा टेक्नॉलॉजीजचा #Reignite ओरिएंटेशन प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळेल. स्टेज 2 नंतर, टॉप परफॉर्मर्स पुढील स्टेजवर जातील, तर बाकीच्यांना टाटा टेक्नॉलॉजीज #Reignite ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र मिळेल. अंतिम टप्प्यात, यशस्वी उमेदवार टाटा टेक्नॉलॉजीजमधील अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सशुल्क इंटर्नशिप सुरू करतील. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन, प्रकल्पांचे काम आणि मौल्यवान व्यावसायिक माहिती यांचा समावेश असेल. 

या स्टेजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये सामील होण्याची संधी मिळेल, तर सर्व सहभागींना त्यांच्या आतापर्यंतच्या  प्रवासाबद्दल #Reignite इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!