‘ग्लॅमर ऑन द रनवे’ मधून पारंपारिकते सह कॉरर्पोरेटचे दर्शन
अनेक समस्यांना तोंड देत ग्लॅमर जगात महिलांचा सहभाग कौतुकास्पद- अभिनेता देव गिल
पुणे: मनोरंजन, फॅशन आणि ग्लॅमर’च्या दुनियेत महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा व कौतुकास्पद आहे. अनेक अडचणींवर मात करून तर विविध समस्यांना तोंड देत काम करण्याची तैयारी महीला दाखवतात हेच या क्षेत्रातच वेगळेपण म्हणावं लागेल; असे मत प्रसिध्द अभिनेते देव गिल (Dev Gill) यांनी व्यक्त केले.
सर्जनशीलता सांस्कृतिक परंपरेला नवीन देणाऱ्या युगात पुण्यातील योंडर इंटोरेज (Yonder entourage) च्या पुढाकाराने तर जॉय ई-बाईक, एमिनेट डिजिटल व सुवर्ण लक्ष्मी निधी लिमिटेड यांच्या सहकार्याने Glamour on the runway (ग्लॅमर ऑन दि रनवे) २०२४ हा अभूतपूर्व शो रविवारी हॉटेल रेडिसन ब्ल्यू हिंजेवाडी येथे संपन्न झाला. यावेळी शो’च्या मुख्य आयोजीका, मास्टर माईंड निकेता कल्याणकर, प्रसिध्द अभिनेते देव गिल, निलेश साबळे, सुनील चाकू, विजय आढाव, ज्योती आढाव, निलेश कल्याणकर, प्राची सिद्दकी, तुषार पाथरे, मुरलीधर सारडा, अनिरुद्ध, वसुधा शोत्रिय, शेखर गाडगीळ, अर्जून भोसले, अभिनेत्री सोनाली, अभिनेता देव थुमब्रे आदी उपस्थित होते.
पारंपरिक, फॉर्मल, कॉर्पोरेट, आणि बाईक या चार राऊंडने प्रेक्षकांची मने जिंकली. सादर केलेल्या प्रत्येक राऊंडमध्ये फॅशनचा नाव आविष्कार उपस्थितांना अनुभवता आला. अनुभवी मॉडेलसह नवोदित मॉडेल्सचे सादरीकरण पाहून आयोजकांना देखील सुखद धक्का दिला. शोचे दिग्दर्शन साम चुर्ची, प्रोडक्शन एस. के. नदीम तर मेकअप साठी यूके इंटरनॅशनल लंडन ब्युटी स्कूलने मेहनत घेतली होती.
पुरुषांच्या बरोबरीने महीला देखील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेले आपण पाहतो. ग्लॅमर’च्या दुनियेत महिलांचं पाऊल आता पुढे जात असून यामध्ये नवोदितांना संधी देणारे मोठे व्यासपीठ म्हणून आम्ही काम करू अशा भावना निकेता कल्याणकर यांनी व्यक्त करत येत्या डिसेंबर मध्ये नवीन शो ची घोषणा देखील यावेळी त्यांनी केली.