हास्य योग परिवाराचा आनंद मेळावा कोथरूडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न
नवचैतन्य हास्य योग परिवाराचे सदस्य चंद्रकांतदादांवर खुश- मकरंद टिल्लू
नवचैतन्य हास्य योग परिवाराचे सदस्य चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड खूश असून, चंद्रकांतदादांसारखा लोकप्रतिनिधी कधीही पाहिला नाही, अशी भावना नवचैतन्य हास्य योग परिवाराचे कार्याध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केली. नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या वतीने कोथरूड विभागाचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील, नवचैतन्य हास्य योग परिवाराचे संस्थापक विठ्ठल कांटे सर, सुमन काटे, जयंत दशपुत्रे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस गिरीश खत्री, अनुराधा एडके, नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या सह हास्य योग परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मकरंद टिल्लू म्हणाले की, माणसांना सृजनशील बनविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले. दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिलंय. असा राजकारणी सामाजिक जीवनात पाहणं मोठं कठीण आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात नकारात्मक माणसांऐवजी सकारात्मक माणसांना साथ दिली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी विठ्ठल काटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दादांच्या कामाचे कौतुक करुन आशीर्वाद दिले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आज जगात प्रत्येकजण आनंदाच्या शोध आहे. हास्य योग परिवाराशी गेल्या पाच वर्षांत खूप जोडला गेलोय, याचा आनंद होतो. ह्या परिवाराने समाजातील नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मकता वाढविण्यासाठी यज्ञ आरंभिला आहे. कोथरूड हे माझं कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना ज्या गोष्टी लागतात, त्या गोष्टींचा उपलब्ध करुन देण्यावर भर आहे. त्यातून सुखी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली.