पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

स्व.गिरीशभाऊंचा विकासाचा आरसा.. कसब्यात हेमंतभाऊंचा तोच वारसा !

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते स्व. गिरीशभाऊ बापट यांनी विकासगंगा आणली आणि जनतेला विकासाचा आरसा दाखवला. स्व. गिरीशभाऊंचा तोच वारसा आत्ताचे भाजपा-महायुतीचे उमेदवार हेमंतभाऊ रासने पुढे चालवत आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघात सहज फेरफटका मारला आणि तेथील मतदारांशी किंवा जुन्या जाणत्या ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा केली तर आवर्जून नाव निघते, ते गिरीशभाऊंचे ! स्व. गिरीशभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून हेमंतभाऊ हे वाटचाल करीत असल्याचा उल्लेख आणि गौरवही काही जणांनी केला. कसब्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अनेक समस्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सोडवल्याचे काहींनी नमूद केले.

त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, शौचालये, रस्त्यावरील दिवे आणि कसब्याच्या गल्लीबोळातील रस्ते यांची उदाहरणे दिली गेली. या प्राथमिक गरजा आणि त्यातून उद्भवलेल्या समस्या याकडे स्व. गिरीशभाऊंपाठोपाठ हेमंतभाऊ हे देखील लक्ष घालत असल्याचा दाखला अनेकांनी दिला.कसबा विधानसभा मतदारसंघ हा गेली कित्येक वर्षे भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधीकडे आहे. येथील समस्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार केला आणि सोडवणूक केली गेली, त्यामुळे येथील चोखंदळ मतदार योग्यच प्रतिनिधी निवडून देतात.

कसब्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. त्या दृष्टीने सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा अद्ययावत करण्याकडे भर दिला आहे, किंबहुना, त्या सुधारणांसाठी मोठा निधीही उपलब्ध करून दिला आहे. स्व. मालतीताई काची यांच्या नावाने गाडीखाना दवाखान्यात सर्व सुविधानी युक्त असे प्रसूती गृह बांधले गेले तर कमला नेहरू रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी मोठा निधी मिळवला गेला आणि त्या दृष्टीने कामही पूर्ण झाले आहे.

काहींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे हे सर्व होत असताना या कामांना आत्ताचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या गोष्टीचा अनेकांनी तीव्र शब्दात निषेधही केला. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला असताना कसबा मतदार संघात रस्त्यांची निर्मिती झाली, त्यात सुधारणा झाली, रस्त्यांचे डांबरीकरण काँक्रिटीकीकरण झाले. अगदी अंतर्गत भागात असलेल्या गल्ल्यांमधील रस्ते ही सुरळीत झाले.

भाजपाच्या काळात सगळीकडे पार्किंग व्यवस्थेचा हा प्रश्न सोडवून पार्किंगचे मोठमोठे स्टेशन उभे करण्यात आले. त्यात प्रामुख्याने आर्यन पार्किंग, सतीश मिसाळ पार्किंग, क्रीडा महर्षी साने सर पार्किंग, शिवाजीराव आढाव वाहनतळ अशा पार्किंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली असून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले.कसबा विधानसभा मतदार संघातील नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधींवर आणि त्यांच्या कामकाजावर खुश असून येथून भाजपाचा उमेदवार विजयी होईल अशी खात्री सर्वजण देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!