आरोग्यपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

निष्ठावंतांवर असा अन्याय होणार असेल तर नवीन कार्यकर्त्यांनी काय करावे – बागुल

मी काँग्रेस पक्षाचा निष्ष्ठावंत पाईक : आबा बागुल

पुणे : मी हॉस्पिटलमध्ये आजारी असल्याने उपचार घेत असताना, तडकाफडकी माझे निलंबन करणे योग्य नाही़ काँग्रेस पक्षाने निलंबनाच्या दोन याद्या का काढल्या़ एक यादी पूर्वी काढली़ त्यात माझे नाव नव्हते़ नंतर दुसरी यादी काढली गेली, यात माझे नाव आले़ त्यामुळे प्रदेश कॉगे्रसवर कोणाचा दबाव होत, असा प्रश्न आबा बागुल यांनी उपस्थित केला़.

याबाबत पत्रकार परिषेदत बोलताना बागुल म्हणाले, काँग्रेस पक्षाने निलंबनाच्या दुसर्या यादीत आणखी नावे लिहिण्यासाठी काही स्पेस ठेवली आहे आणि त्यानंतर नाना गावंडे यांची सही आहे़ नक्की यातून कोण काँग्रेस संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे हे पाहणे गरजेचे आहे़ मी काँग्रेस विचाराचाच पाईक आहे़ काँग्रेस पक्षाचाच एक निष्ठावंत आहे व माझ्या बरोबर अशी निलंबनाची कारवाई होत असेल तर, माझ्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करायचे काय़ आपण मला वेळोवेळी २००९ पासून विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले ते मी ऐकले व मागे हटलेलोही आहे़. माझी संधी तीन वेळा हिरावून घेतली गेली आह़े .

Oplus_131072

जो पक्ष तीन वेळा पर्वती विधानसभा मतदार संघात हारतो, त्यांनाच पुन्हा पुन्हा हा मतदार संघ सोपविला जातो, की जो मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला होता़ त्यामुळे हे कितपत योग्य आहे़ अशावेळी माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांने करायचे काय असा प्रश्न आबा बागुल यांनी काँग्रेस पक्षाकडे उपस्थित केला़.

निष्ठेची कदर होणार नसेल तर नवीन पिढी काँग्रेसकडे कशी येणाऱ याचा विचार करून आपण माझे निलंबन मागे घ्याल असा मला विश्वास आहे़ मी काँग्रेस पक्ष वाचविण्याकरिता व वाढविण्यासाठी हा प्रयत्न करीत आहे, असेही आबा बागुल यांनी सांगितले़ .

तसेच मी काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढत नाही़ ही महाविकास आघाडी ही तोंडी आघाडी आहे, ही कुठेही अधिकृतरित्या आघाडी म्हणून नोंद केलेली नाही़ उद्या आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याला जर दगा दिला तर याला कोण जबाबदार असेल़ यापूर्वीही पुणे महापालिकेत पुणे पॅटर्न झालेला आहे़राष्ट्रवादी काँग्रेस, सेना व भाजप एकत्र आलेले आहेत याची आठवण यावेळी आबा बागुल यांनी करून दिली़

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!