आरोग्यपुणेव्यवसायीक

ओॲसिस फर्टिलिटीच्या वतीने पुण्यात वंध्यत्व जनजागृतीसाठी एआरटी कॉन्क्लेव्हचे आयोजन

पुणे : वंध्यत्वावर मात करीत पालकत्व मिळण्यासाठी उपचार आणि आयव्हीएफ प्रक्रिया तसेच वंध्यत्वाच्या संदर्भातील जनजागृतीसाठी ओऍसिस फर्टीलिटी या देशातील अग्रणीय आयव्हीएफ सेंटरमार्फत वंध्यत्वाच्या संदर्भात अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी या हेतूने एआरटी कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते.

या कॉन्क्लेव्हमध्ये २०० हून अधिक डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला होता . या कॉन्क्लेव्हमध्ये प्रसिद्ध स्त्रीप्रसूती विशेष तज्ञ पराग बिन्नीवाले यांसह ओॲसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि मुख्य चीफ एम्ब्रॉयोलॉजिस्ट डॉ. कृष्ण चैतन्य, ओॲसिस फर्टिलिटीचे सह-संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. दुर्गा जी. राव, आणि ओॲसिस फर्टिलिटी, पुणेचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. निलेश उन्मेश बलकवडे उपस्थित होते.

पुण्यातील दोन शाखांसह ओॲसिस फर्टिलिटीचा यशाचा दर सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के आहे. तंत्रज्ञान, प्रगत विश्लेषणे आणि संशोधनाचे पाठबळ लाभलेले वंध्यत्व उपचार स्त्री आणि पुरुष दोघांनाही पुरवले जात आहेत आणि या सेंटरच्या सहाय्याने हजारो जोडपी पालक बनली आहेत. या प्रसंगी बोलतांना, ओॲसिस फर्टिलिटीचे सह-संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. दुर्गा जी. राव म्हणाल्या की फर्टिलिटी एक्स्पर्ट आणि स्त्रीरोग तज्ञांसह व्यापक लोकसमूहापर्यंत अत्याधुनिक तंत्रांचा एआरटी कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून प्रचार करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून रुग्णांचे परिणाम सुधारण्यात मदत होऊ शकेल.

ज्या दिवशी ओॲसिस फर्टिलिटीने पुण्यात आपले कार्य सुरू केले त्या दिवसापासून आम्ही खूप उत्साही आहोत. प्रगत तंत्रज्ञान, श्रेष्ठ वंध्योपचार तज्ञ आणि जागतिक दर्जाच्या आयव्हीएफ लॅबसह महाराष्ट्रात आम्ही नेहमीच आघाडीवर होतो. पुरुष वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी मायक्रो-टीईएसई प्रक्रिया ऑफर करणाऱ्या देशातील मोजक्या केंद्रांपैकी आमचे पुणे केंद्र हे एक आहे.

ओॲसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि मुख्य चीफ एम्ब्रॉयोलॉजिस्ट डॉ. कृष्ण चैतन्य म्हणाले की वंध्योपचाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या बाबतीत झपाट्याने बदल होत असल्यामुळे यांसारख्या एआरटी कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून जागतिक स्तरावर होत असलेल्या वैज्ञानिक प्रगतीवर प्रकाश टाकण्याचे आमचे ध्येय आहे. इतकेच नाही तर वंध्योपचार क्षेत्रातील मंडळींबरोबर आमची तज्ञता सामायिक करण्याचीही आमची इच्छा आहे जेणेकरून रुग्ण उपचाराचा प्रवास चांगला होऊ शकतो.”

या प्रसंगी बोलताना ओॲसिस फर्टिलिटी, पुणेचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. निलेश उन्मेश बलकवडे म्हणाले की अडथळे ओलांडणे आणि उपचारांच्या अनेक शक्यतांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे सुरुवातीपासूनच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील दुय्यम व तिय्यम भागांमध्ये अनेक विनामूल्य वंध्योपचार सल्ला शिबिरांमधून आम्ही हे साध्य केले आहे. महिलांना त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात प्रेरणा, समर्थन आणि सहाय्य करण्यासाठी ‘मला मिलेनियल मॉम व्हायचे आहे’ ही आमची अनोखी मोहीम असून आहे. आमच्या समर्पित पुरुष प्रजनन क्लिनिक असलेल्या अँड्रोलाईफच्या माध्यमातून आम्ही सर्व पुरुष वंध्यत्व समस्यांचे निराकरण करतो. आम्ही सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा अवलंब करतो आणि पीजीटी, ईआरए, मायक्रो-टीईएसई इत्यादी सर्व प्रगत तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उपलब्ध करून देतो. संशोधनातील आमचा पाठपुरावा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रयत्न यांमुळे आम्हाला उपचारांचा अनुभव आणि रुग्णांचे परिणाम यांमध्ये सुधार करण्यास मदत झाली आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!