पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

५०० विद्यार्थ्यांनी साकारला श्री रामायणाचा बहारदार सोहळा

विद्या वर्धनी इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक उत्सव मोठ्या आनंदात संपन्न

शिवाजीनगर: विद्या प्रसारिणी सभा पुणे अंतर्गत संचलित विद्या वर्धनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त यंदा रामायण या थीमवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात साधारण पाचशे विद्यार्थ्यांनी श्री रामायणाचा बहारदार सोहळा मोठा दिमाखात सादर केला. विद्यार्थ्यांची कलाकृती पाहून आलेल्या पाहुण्यांसह, शिक्षक व पालक देखील भारावून गेले होते.

श्री राम जन्म मोहोत्सवापासून, त्यांचे गुरुकुल मधील शिक्षण, सीता स्वयंवर, रामसीता लग्न सोहळा, वनवासमधील अनेक प्रसंग, शूर्पणखा, शबरी माताची ममता, सिताहरण, जटायु, श्रीराम भक्त बजरंगबली हनुमान, श्री राम सेतूचे निर्माण करून रावण वध आणि श्रीराम- सीता व लक्ष्मण यांचे आयोध्या आगमन आदी रामायणातील महत्त्वाचे सर्वच प्रसंग संगीतमय कलाकृतीने विद्यार्थ्यांनी साकारले होते.

विद्यार्थ्यांचे कौतुक व हा सोहळा पाहण्यासाठी विद्या प्रसारिणी सभेच्या चेअरमन डॉ मृणालिनी गरवारे, जॉईंट सेक्रेटरी विजय भुरके, डॉ. सुभाष मेहता, शाळेच्या प्राचार्या रेणू सुंबळी, तापरे सर, वर्षा क्षीरसागर, चंचल ललवाणी, नितीन गर्वा, गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर शिल्पकला रणदिवे, पुणे मनपा शैक्षणिक अधिकारी सेंडकर सर यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील इतर मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन राज शिरगावकर, प्रेम शिरगावकर व तुषार सागवेकर यांनी केले होते. सूत्रसंचालन ललिता जाधव तर आभार अनिकेत कलंगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!