सौ. स्मिताताई शैलेश लडकत यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर

पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कैलासवासी सौ.क्रांतीताई कैलासराव कोद्रे यांच्या स्मरणार्थ ब्रम्हांड संस्था, प्रयास संस्था व मनशा फाऊंडेशन च्या सहकार्यने महिला भगिनीसाठी मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या अध्यक्षा तसेच माळी महासंघ पुणे शहर महिला अध्यक्षा सौ.स्मिता शैलेश लडकत यांच्या वतीने आज गुरूवार दि. 23 मार्च 2023 रोजी करण्यात आले होते.
यावेळी कैलासमामा कोद्रे, शैलेशभाऊ लडकत, माजी नगरसेविका स्मिता वस्ते, माजी नगरसेविका पूजा कोद्रे , ज्ञानेश्वर मोझे, दीपक जगताप, मधुकर राऊत, शारदाताई लडकत, शिवरत्न मंडळाचे पदाधिकारी सदस्य व लाभार्थी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
कै. महेशभाऊ लडकत जनसंपर्क कार्यालय, नवीपेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात प्रामुख्याने स्तन कॅन्सर तपासणी, गर्भाशय कॅन्सर तपासणी या प्रमुख स्त्री रोगाची तपासणी व निदान करण्यात आले. आलेल्या प्रत्येकासाठी ठेवण्यात आलेल्या अल्पोपाराचा व सदर शिबिराचा परिसरातील शेकडो महिलांनी लाभ घेतला आणि आयोजक स्मिताताई लडकत, शैलेशभाऊ लडकत यांचे आभार मानले.