पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा
पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी

पुणे : पुणे शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीरजखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे पत्रकार संदिप कद्रे यांच्या पत्नीसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. नायलॉन मांजाला बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडे कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
कोंढवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटी येथीलनातलगांना भेटुन घरी जाताना ज्योती कद्रे या गुरुवारीसायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सासुबाई यांना सोबत घेऊन दुचाकीने निघाल्या होत्या. यावेळी नायलॉन मांजाने त्यांच्या मानेला मोठी दुखापत झाली. खाजगी रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतला. शिवाय, दुचाकीवरील अन्य दोन महिला नायलॉन मांजामुळे जखमी झाल्या आहेत. पुणे शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजामुळे दुखापतीच्या घटना घडत आहेत.
प्रशासन अधिकारी आणि पोलिसांच्या निष्काळजी पणामुळेअनेकांना दुखापत होताना दिसत आहे. या मांजाच्याविक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सर्रास विक्रीहोत असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षात केवळ १६गुन्हे झाले आहेत. २०१७ पासून हानिकारक नायलॉनमांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आलीआहे. बारीक काचेचा लेपित धागा असणारा हा नायलॉनमांजा पुणे शहरात सर्रास विकला जात आहे.
पुणे शहरातगेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान १६ गुन्हेपोलिसांनी दाखल केले आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक ७ गुन्हेदाखल करण्यात आले आहे. २०२४ मध्ये पोलिसांनी चारगुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांना अटक करण्यातआली आहे.महाराष्ट्र सरकारने मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्यासुरक्षेचा हवाला देत पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाच्याधाग्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यावर बंदीघालणारी अधिसूचना जारी केली होती. सरकारने बंदीचेउल्लंघन केल्याबद्दल दंड देखील ठोठावला आहे. ज्याम५ हजार रुपयापर्यंत दंड आणि 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचा देखील समावेश आहे.
विशेषत:मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना याधाग्याचा वापर केला जातो. झाडांमध्ये किंवा रस्त्याच्याकडेला अडकलेला या मांजामुळे अनेक नागरिक गंभीरजखमी झाले आहेत. यात सर्वाधित फटका पशू पक्षांनाबसला आहे. दरम्यान, मकर संक्रांतीचा सण जवळ आल्यानेपुणे पोलिसांनी शहरातील बंदी असलेल्या मांजाच्याविक्रीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचीमागणी नागरिकांकडून केली जात आहे.