पुण्यातील पाहिले मोफत होमिओपॅथिक क्लिनिक लोकसेवेत रुजू
गरजूंना वैद्यकीय मदत आणि महिलांना व्यवसाय देणार - डॉ. योगेश कदम

पुणे; विश्रांतवाडी- मोफत क्लिनिक आणि वैद्यकीय मदत कक्षामुळे गोरगरीब जनतेला नक्कीच मोठा दिलासा मिळेल. डॉ. कदम दाम्पत्य उच्च शिक्षित असून त्यांची सामाजिक भावना प्रशंसनीय आहे. त्यांच्या या सेवेचा लाभ नागरिकांनी नक्की घ्यावा असे आवाहन कृषीरत्न/कृषीमहर्षी डॉ. बूधाजीराव मुळीक यांनी केले.
डॉ. योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भूमाता चॅरिटेबल क्लिनिकचे लोकार्पण आणि वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन तसेच महीला भगिनींसाठी मोफत व्यावसायिक मार्गदर्शन, रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी कृषीरत्न, कृषीमहर्षी डॉ. बूधाजीराव मुळीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी लिज्जत पापडचे सुरेश कोते, व्यावसायिक मार्गदर्शक एस. एस. सावंत, डॉ. भाग्यश्री कदम उपस्थित होते.

आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, सुनील टिंगरे, मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, भूमाता युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत भैय्या जगताप, उद्योजक किसन भोसले, राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाचे निनाद टेमगिरे यांनी देखील डॉ. योगेश कदम व सौ. भाग्यश्री कदम यांना शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर कदम यांनी प्रयागराज कॉर्नर, विद्यानगर येथे चालू केलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून परिसरातील गरीब नागरिकांना नक्कीच मदत होईल. सोबतच रुग्णालयाचे मोठमोठे बिल कमी करण्यात देखील सहकार्य केले जाणार असल्याची माहिती डॉक्टर योगेश कदम यांनी याप्रसंगी दिली.