पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

पुणे महानगरपालिकेची कोट्यावधीची जागा गिळंकृत करण्याचा डाव

वक्फ बोर्डाच्या जागेच्या नियंत्रणासाठी नवीन विधेयक मात्र स्वतःच्या जागेच काय..? जांबुवंत मनोहर यांचा सवाल

पुणे: पुणे महानगरपालिका हद्दीतील विंडसर अवेन्यू कॉन्डोमिनियम, स. नं. ६०, वानवडी पुणे – ४११०४० या सोसायटीने साधारण ४०,००० चौ.फू. क्षेत्रफळाच्या, बाजारभावानुसार अंदाजे ₹३५ ते ₹४० कोटी रुपये किमतीची महानगरपालिकेच्या मालकीची जमीन बळकावून कब्जा केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत सागरबाई मनोहर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी दत्ता पाकीरे (पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस), अनिरुद्ध सुर्यवंशी ( उपाध्यक्ष पुणे शहर ), शहाजहान झारी (चिटणीस पुणे शहर) आदी उपस्थित होते.

जांबुवंत मनोहर म्हणले, एकीकडे सरकार वक्फ बोर्डाच्या जागेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन विधेयक आणण्याची तयारीत आहे; परंतु स्वतःच्याच जागेवर कोणी कब्जा मारते याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. पुणे शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिसांसमवेत संयुक्त कारवाई केली जाणार असल्याचे आदेश असताना देखील पुणे महानगरपालिका स्वतःच्याच जमिनीवरील अतिक्रम का काढू शकत नाही ? समाजवादी पक्षातर्फे निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नसेल तर सोसायटी सोबत पुणे महानगरपालिकेची मिली भगत तर नाही ना..? असा संशय आम्हा कार्यकर्त्यांना येत आहे.

सदर सोसायटीला पुणे महानगरपालिका कडून जा. क्र. ०५/ ३४६१ दिनांक ०४ /०९ / २०२४ आणि जा. क्र. ०५/ ३८७० दिनांक २५ / ०९ / २०२४ रोजी अशा दोन नोटीसा जागा मोकळी करणेबाबत देण्यात आल्या असून देखील सोसायटीने अद्याप अतिक्रमण हटवले नाही. आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाला सुद्धा कष्ट घ्यावेसे वाटले नाही म्हणून समाजवादी पक्षाला हे कष्ट घ्यावे लागत आहे असे देखील जांबुवंत म्हणले.

सदर जागेवर सोसायटीने नेमकं काय केलं… पुणे महानगरपालिकेच्या मालकीची जमीन बळकावून येथे अनधिकृत पेड पार्किंगचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. उर्वरित जागेत गार्डन तयार केले मात्र तेथे लहान मुलांना खेळण्यासाठी अथवा ज्येष्ठांना विरंगुळा व्हावा यासाठी परवानगी नसून काही ठराविक लोकांच्या पार्ट्या आणि अय्याशीसाठी वापर केला जात आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा व्यवसाय चालू असताना देखील महानगरपालिका कारवाई का करत नाही…? जर येत्या दोन दिवसात कारवाई झाली नाही तर सदर जागेवर समाजवादी पक्षातर्फे तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!