शिव शंभो मित्र मंडळ (ट्रस्ट ) तर्फे धान्य, फळे व खाऊ चे वाटप
_भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना आगळे वेगळे अभिवादन

पुणे (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शिव शंभो मित्र मंडळ (ट्रस्ट) तर्फे कात्रज येथील ममता फाउंडेशन (अनाथ आश्रम) येथे मंगळवारी दोन महिने पुरेल इतका धान्य साठा, मुलांसाठी खाऊ आणि फळे भेट देऊन कार्यक्रम घेण्यात आले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब लिखित संविधानाची प्रत मुलांना देऊन संविधानाचे महत्व पठवून देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सागरसिंग टाक, संग्रामसिंग टाक, ममता फाउंडेशन चे अमर बुडुक, सौ. शिल्पा बुडुक, गणेश शेरला, सागर धडे, अक्षय पवार, निकिता ताई, बळीराम पाटोळे, दौलतराव धेंडे, भावेश मोरे, विकास चाबुकसवार, सुरज शिंदे, महेश साळुंखे, विशाल आयटोळे आदी उपस्थित होते.

सागरसिंग म्हणले, बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा लोक हिताचा संदेश आत्मसात करून आजच्या मुलांनी स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम शिक्षण घेणे काळाची गरज आहे. या उपक्रमातून बाबासाहेबांचे गुण आपण आत्मसात केले तरच खऱ्या अर्थाने त्यांना आदर्श अभिवादन ठरेल.