पुणेमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने डॉ. होमी भाभा बालवैद्यानिक स्पर्धा 2025 मध्ये विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव साजरा केला

पुणे: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), चाचणी तयारी सेवांमध्ये अग्रगण्य, पुणे विभागातील 4 विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बालवैद्यानिक स्पर्धा (DHBBVC) 2025 च्या अंतिम परीक्षेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकून केलेल्या अभूतपूर्व यशाची घोषणा करताना गर्वाने उत्सव साजरा केला आहे. ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन (GBSTA) द्वारे आयोजित ही स्पर्धा, युवकांमध्ये जिज्ञासा, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी प्रसिद्ध आहे.

पुणे विभागातील 4 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांनी प्रमुख कामगिरी केली आहे. आरव अग्रवाल यांनी 79 गुणांसह सुवर्ण पदक आणि ₹3,000 ची शिष्यवृत्ती प्राप्त केली, तर वंश भविक्कुमार शाह आणि सिद्धांत आर्य यांनी अनुक्रमे 70 आणि 87 गुण मिळवून रौप्य पदके आणि ₹2,000 ची शिष्यवृत्ती जिंकली. याशिवाय, सोलापूरच्या तनमय शेते यांना कांस्य पदक आणि ₹1,000 ची शिष्यवृत्ती देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या चार टप्प्यांमधून यशस्वीरीत्या मार्ग काढून ही कामगिरी केली आहे.

oplus_2

महाराष्ट्रभरातून आकाशमधील एकूण 11 विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठित पदकांसह गौरव प्राप्त केला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अकोला, जळगाव आणि मुंबई येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, AESL चे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एचआर राव म्हणाले, “डॉ. होमी भाभा बालवैद्यानिक स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश केवळ त्यांच्या शैक्षणिक ताकदीचेच नव्हे तर त्यांच्या जिज्ञासा, विचारशक्ती आणि वैज्ञानिक शिक्षणाच्या उत्कटतेचेही द्योतक आहे. हे यश त्यांच्या कठोर परिश्रमांचे आणि समर्पणाचे फलित आहे. आकाश येथे, आम्ही विद्यार्थ्यांना मजबूत शैक्षणिक पाया देण्यासोबतच पाठ्यपुस्तकांपलीकडे विचार करण्यासाठी प्रेरित करतो. आम्हाला त्यांच्या या उल्लेखनीय प्रवासाचा भाग झाल्याचा अभिमान आहे.”

डॉ. होमी भाभा बालवैद्यानिक स्पर्धा, 6 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. ही स्पर्धा चार टप्प्यांमध्ये होते: सिद्धांत स्पर्धा, प्रायोगिक स्पर्धा, सामान्य मुलाखत आणि कृती संशोधन प्रकल्पावर आधारित मुलाखत व मूल्यांकन। या स्पर्धेचे उद्दिष्ट वैज्ञानिक तत्त्वांची समज, तर्क आणि त्यांचा उपयोग वाढविणे आहे.

AESL ही वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, शाळा व बोर्ड परीक्षा, तसेच IOQM, NSEs, NSO, IMO यांसारख्या प्रमुख ऑलिम्पियाड स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना व्यापक कोचिंग सेवा देणारी अग्रणी संस्था आहे. देशभरातील 315 पेक्षा अधिक केंद्रे आणि 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसह, AESL ने चाचणी तयारी क्षेत्रात आपली एक मजबूत ओळख निर्माण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!