पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयस्तंभ पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले

पुणे: दरवर्षी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभाला अभिवादन करून शूर वीरांना वंदन केले.
सदर ठीकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली होती.यंदाचं विजयस्तंभ शौर्य दिनाचं 204 वं वर्ष असल्याने या सोहळ्याला खास महत्त्व आलेलं आहे. विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी न होऊ देण्याचे आवाहन देखील जनतेला करण्यात आले आहे.