पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषव्यवसायीकसामाजिक

माहेश्वरी समाजाचा वंशोत्पती दिवस महेश नवमीनित्तम भव्य मिरवणूक

जय महेश मंच, पुणेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी): सकल माहेश्वरी समाजाचा वंशोत्पती दिवस म्हणून महेश नवमीनिमित्त बुधवारी भगवान महेश यांची भव्य शोभायात्रा जय महेश मंच, पुणे यांच्या वतीने काढण्यात आली. शोभायात्रेचा प्रारंभ यशोधन सोसायटी कोंढवा, पुणे येथील शिव मंदिरापासून महादेवाच्या अभिषेक, पूजा व आरतीने करण्यात आला. आकर्षक रथात भगवान महेश यांच्या प्रतिमेस विराजमान करून विविध झाकी समवेत महिला पुरुषांच्या पारंपरिक वेषात ही शोभायात्रा यशोधन सोसायटी पासून प्रारंभ होऊन शांतीनगर, कोंढवा-कात्रज रोड, गोकुळ हॉटेल, महेश चौक, मार्गे पुष्कर धाम येथे समारोप करण्यात आला होता.

यंदाच्या मुख्य आकर्षणामध्ये उज्जैनहून आलेला अघोरी समुदाय यांच्या नृत्यकला व शिवपार्वती विवाह सोहळ्याचा नयनरम्य, भक्तिमय सादरीकरणाने सर्वांचेच मन जिंकले होते. यासोबतच शोभायात्रेत उंट, घोडे, ढोल, डिजे यांचा देखील समावेश होता. मुख्य कार्यक्रमादरम्यान जय महेश मंचाच्या वतीने सी.एस. पवन चांडक (उपाध्यक्ष ICSI), आणि सी.ए कमल किशोर राठी (डायरेक्टर फायनान्स यशदा) यांना महेश प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या विविध प्रतियोगितांचे बक्षिस वितरण देखील याप्रसंगी करण्यात आले. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला होता.

महेश नवमीच्या या सोहळ्यासाठी सचिन मालपाणी, रामविलास तापडिया, बालाप्रसाद तापडिया, चंद्रकांत मालपाणी, रवींद्र राठी, संतोष लड्डा, रमेश लड्डा यांची विशेष उपस्थिती होती. जुगल पुंगलिया, संतोष चोपडा, मघराज राठी, प्रशांत झंवर, सी.ए. आर.जे लाहोटी यांचे विशेष सहकार्य लाभले होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय महेश मंचचे अध्यक्ष सचिन कालानी, उपाध्यक्षा सौ. सोनल फोफलिया, सचिव प्रवीण तोष्णीवाल, कोषाध्यक्ष किशोर तोष्णीवाल, सदस्य श्रीकांत भुतडा, राहुल भुतडा, गौरव भुतडा, विपीन बंग, रोहित सारडा, सौ. श्रद्धा झंवर, सौ. प्रियंका साबू यांच्यासह मंचाच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचाचे अध्यक्ष सचिन कालानी यांनी केले. सूत्रसंचालन सी.ए. अंकिता बांगड तर आभार प्रवीण तोष्णीवाल यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!