आदित्य ठाकरे (राज्य कॅबिनेट मंत्री) उद्या पुण्यात
मोफत कोविड लसीकरण महाअभियान केंद्रचे करणार उद्घाटन
पुणे: नागरिकांना जलद गतीने लस मिळावी या हेतूने शिवसेना पुणे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे (अध्यक्ष, मंडई विद्यापीठ कट्टा,पुणे) यांच्या वतीने ५१ हजार नागरिकांना मोफत कोविशील्ड लस महाअभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी विषेश सहकार्य विलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल कोर संस्था-अमेरिका यांचे लाभले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांना जीव गमवावा लागले तर आजही राज्यातील अनेक रुग्ण या महामारी सोबत लडत आहेत. कोरोना संसर्गापासून जर स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे असेल तर कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकांने घेऊन स्वतःची जवाबदारी पुर्ण करणे आवश्यक आहे. या भावनेने हे केन्द्र चालू करत आहे; अशी माहिती मालुसरे यांनी दिली.
कमल स्मृती हाऊस शुक्रवार पेठ, नेहरू चौक, बोंबिल मार्केट लेन ,पुणे येथे आयोजित केलेल्या या मोफत कोविड लसीकरण महाअभियान केंद्रचे उद्घाटन उद्या दिनांक २९ सप्टेंबर २०२१ वार बुधवार रोजी दुपारी १२.१५ वाजता होणार असून, सदर कार्यक्रमासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत प्रमुख उपस्थितीत डॉ.नीलमताई गोर्हे (उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद), सचिन आहिरे (संपर्क प्रमुख), आदित्य शिरोडकर (सहसंपर्क प्रमुख), शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे आदी असणार आहेत.